माझी गझल
वृत्त-मनोरमा
गालगागा गालगागा
🌷 वरदान 🌷
तू दिलेले दान आहे
हे किती रे छान आहे
रेशमी ओटीत माझ्या
खेळणारे प्राण आहे
बोबडेसे बोल बोले
ही गुणाची खाण आहे
लाजवी चंद्रास भारी
रंग गोरा पान आहे
लेकराच्या कौतुकाचा
या जिवाला मान आहे
ही सुखाची वेल वाढे
दोन दारी शान आहे
लपविते पदरात आता
लाभले वरदान आहे
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
28/01/17
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.