माझी गझल
भुई भार
किती पाप सारे,भुई भार झाले
नसे चाड कोणास,लाचार झाले
मनाच्या तळाशी कलीचे युग हे
नितीचे उखाणे तडीपार झाले
भुकेल्या जिवाला बहाणे तुपाचे
असे भाव खोटेच व्यापार झाले
इथे कोण नाही कुणाचे कधीही
लगातार पाठीवरी वार झाले
मरे रोज त्याला कुणी का रडावे
नक्राश्रू असे कोरडे क्षार झाले
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
Copyright
शुभ रात्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.