सोमवार, १ एप्रिल, २०१९

अभंग

सही बोल यार  ** सुधाकरी स्पर्धा


1
आनंद भरारी
घेतली गोडीन
जीव तो तोडून
सुधाकरी...
*************
2
कमी असे वेळ
परी येते बळ
कधी होई घोळ
शब्दांचा तो ..
**********
3
देवा पांडुरंगा
द्यावे मज दान
भरारी घेवुन
पदस्पर्श
*********
4
नश्वर हा देह
जाणावा सदा रे
भरारी ती घ्या रे
मोक्षा प्रती
*********
5
रात्रं दिन आम्हा
युद्धाचा प्रसंग
बांध लाय चंग
भरारीचा ..
********
6
भरारी असावी
नात्यात राहून
प्रेमाला वाहून
सर्वाठायी
*******
7
गोड असे बाळ
देवाचा पुजारी
घेतली भरारी
ध्रुव तारा
********
8
पांग मी आईचे
सारे ते फेडीन
यशस्वी होईन
जीवनात
*********
9
सोन्याच्या भावाने
घेतली भरारी
नको ती उधारी
दुष्काळात
*******
10
अवखळ बाळ
सदा करी खोड
वेडे पणा सोड
मोठे पणी
***********
11
बियाणे ही किती
करपली पहा
माती तहानली
दुष्काळात ...
************
12
राम कुंडा वरी
रामाची बिछाई
तिथं पाय चेपी
सीतामाई ...
********
13
नांगराच्या फाळा
पेटी ग लागली
सीता सापडली
जनकाला ..
*********
14
रवि उगवला
चंद्र भागा तीरी
आंघोळ करिते
रुख्मीनी ती ...
*******
15
सत्याची सावित्री
बोलली यमाला
सुख ना जीवाला
पतिविना ...
**********
16
सावित्री पडली
आडवी यमाला
चुडे दान मला
विनविते ...
17
पिकले डाळिंब
आणा लवकरी
तेज मुखवरी
कौसल्येच्या ..
***********
18
पाळणा झुलतो
चांदवा हालतो
पाळणी खेळतो
बाळ कृष्ण ...
************
19
रवि उगवला
उधळी गुलाल
पांघरली शाल
धरित्रीनं ..
********
20
नात्या गोत्याची ती
भरली ग सभा
जीवनाला शोभा
पतिराज
*********
21
वाळूचे कण
प्रयत्ने रगडा
करावा झगडा
संकटांशी ...
***********
22
द्यावे मज दान
ऐसे तू देवा
करी जग हेवा
नशिबाचा ...
************
23
सवित्रीच्या लेकी
आहेत करारी
घेतील भरारी
शिक्षणात ..
**************
24
ज्योतिची सावित्री
रस्त्यांन चालली
खडी ग मारीली
दुष्टानी त्या ...
****************
25
शेजारीण बोले
भाऊ किती जण
चंद्र सूर्य दोन
अवकाशी ....
**************
26
राम घामेजला
सीता घाली वारा
वनवास सारा
सुखवित ..
*************
27
सीता वनवाशी
लव कुश कुशी
लता वेली पुशी
खुशाली ती ...
**************
28
दोन बायकांची
हौस ग गड्याला
गेला ग वढ्याला
आंघुळीला ...
**************
29
सोन्याची पाटली
हाताला दाटली
खुशाली वाटली
नाव घेता ...
**********
30
तुळ शी ग बाई
जन्म रानी वनी
ये ग वृन्दावनी
अंगणात ..
********
31
जावई पाहुणा
सासुला उल्हास
दुधाचा गल्लास
भरीतसे ..
**********
32
मुले पुसतात
का येईना मामा ?
गुंतला ग कामा
आई बोले ...
**********
33
दुपारचे उन
करी रण रण
शेला पांघरुण
घे रे बाळा ...
************
34
आधी रोहिणीचा
पाऊस पडतो
पाळणा हालतो
बहिणीचा ...
***********
35
अभिमन्यु बाळ
गरुडाचे पिलू
लागे सारे पळू
कौरव ते ...
********
36
श्रीराम लक्ष्मण
मधे सीता शोभे
सेवेशी ते उभे
महाबली ..
**********
37
कौसल्या माऊली
राम धरी पोटी
आयुष्य ते कोटी
मागतसे ...
**********
38
सागरात सेतु
बांधला वानरी
रामाची सुंदरी
सीते साठी ...
**********
39
सीतेच्या शोधाला
गेले हनुमंत
झाले कीर्तिवंत
तिन्ही लोकी ..
************
40
श्रीराम लक्ष्मण
धनुष्याचे बाण
लावण्याची खाण
सीता माई ...
*********
41
दिंडी पंढरीची
चाले वारकरी
आली ती वाखरी
विसाव्याला ..
*************
42
हृदयात जपा
मानवता धर्म
हेच खरे वर्म
जीवनाचे ...
*********
43
गुणगुणावीं ती
अबोल कविता
शब्दांची सरिता
वाहतसे ...
********
44
गुलाबी गोंडस
तुझा हस्त स्पर्श
झालाय हर्ष
सोनु बाळा
*********
45
कातर वेळ ती
मन झाले हट्टी
तुझ्याशी ती कट्टी
लटकीच ...
**************
46
अबोल झाली रे
घरे दारे गुरे ..
सगेसोयरे रे
या दुष्काळी ...
************
47
झुळ झुळ वाहे
नितळ निर्झर
अलवार स्वर
खळखळ ...
***********
48
येशील का रे तू ?
फुंकर घालाया
जमिनी फाटाया
लागल्या रे ...
***************
49
भोजन करावे
राहून आनंदी
नको वादा वादी
ताटा वरी
**********
50
ओढुन ते कधी
पांघरूच नाही
तर मान राही
समाजात ..
***********
51
हरिचंद्र राजा
तारामती राणी
डोंबा घरी पाणी
भरीतसे ...
*********
52
चंद्र तारकांची
फुले प्रेमकथा
आवसेचा चंद्र
विरहात ....
*********
53
ऋतू चक्राचे
फिरते चाक ...
वेगळीच झाक
सृष्टीची ती..
************
54
ध्यास तुझा माझ्या
अंतरात जागतो ...
स्वप्नि भेटण्यास
आतुरतो ...
**********
55
जीवन  हिंदोळा
सुख दुःख झोके
शांत ठेवा डोके
सदोदित....
***********
56
कागदी निकाल
पोकळ भेंडोळे ...
करील वाटोळे .
देशाचे ते ...
************
57
........................
सुखाच्या शोधात
सभोती फिरले ....
माझ्या सापडले
पदरात......
************
58
सुखाची ती हाव
सुटता सुटेना ...
लोटता लोटना
दुःख पूर
***********
59
नित्य भरू दे
ओंजळ सुखाची ..
झळ दुःखाची
लागो नये
************
60
ओंजळ सुखाची
भरो काठोकाठ ...
ती जीवनवाट
फुलांची ती....
****सौ.संगिता भालसिंग भालसिंग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲