शनिवार, २९ जून, २०१९

रुसवा

सखा सखीची समजूत काढत आहे (कल्पना )
 रुसवा सोड सखे 
रुसवा सोड सखे,ये
आनंदाने नांदायला
तुझ्याविना सुकलेल्या
संसाराला पहायला ...
घरात तुझा वावर
धुंद सुगंधा सारखा
देवा पुढे धूपालाही
झालोय ग मी पारखा ...
छुन छुन पैंजणाची
काळजात रुतलेली
टच टच जोडव्याची
हृदयात घसलेली ...
किणकिण काकणाची
कानात ग घुमलेली
गुणगुण आवाजाची
मनात बहरलेली ...
चंद्रकोर भाळावर
नजरेत भरलेली
स्पर्श रोमांच सुखाची
सवय फार  झालेली ...
अंगणात वृंदावन
तुळसही सुकलेली
तीही पाहतेय वाट
नजर आसुसलेली ...
******************
सौ.संगिता भालसिंग
Sangita Bhalsing
अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲