दिलेल्या शब्दांचा अचूक अर्थ त्यापुढील पर्यायांतून ओळखा.
अपरोक्ष म्हणजे:-
०१) नजरेसमोर
०२) पाठीमागे
०३) अप्रत्यक्ष
०४) एकाक्ष
उत्तर - पाठीमागे
दिलेल्या शब्दांचा अचूक अर्थ त्यापुढील पर्यायांतून ओळखा.
बुद्धिगम्य म्हणजे:-
०१) बुद्धीला अगम्य
०२) बुद्धीला समजणारे
०३) अनाकलनीय
०४) बाळबोध
उत्तर - बुद्धीला समजणारे
दिलेल्या शब्दांचा अचूक अर्थ त्यापुढील पर्यायांतून ओळखा.
हवालदिल म्हणजे:-
०१) दिलदार
०२) दिलखुलास
०३) अस्वस्थ
०४) निराश
उत्तर - निराश
दिलेल्या शब्दांचा अचूक अर्थ त्यापुढील पर्यायांतून ओळखा.
संदिग्ध म्हणजे:-
०१) संबद्ध
०२) संलग्न
०३) अनिश्चित
०४) संशयित
उत्तर - अनिश्चित
दिलेल्या शब्दांचा अचूक अर्थ त्यापुढील पर्यायांतून ओळखा.
यथावकाश म्हणजे:-
०१) कालांतराने
०२) आकाशाएव्हढे
०३) अवकाशाप्रमाणे
०४) यथाशक्ती
उत्तर - कालांतराने
दिलेल्या शब्दांचा अचूक अर्थ त्यापुढील पर्यायांतून ओळखा.
निपुण म्हणजे:-
०१) अतिहुशार
०२) चलाख
०३) कुशल
०४) चांगला
उत्तर - कुशल
दिलेल्या शब्दांचा अचूक अर्थ त्यापुढील पर्यायांतून ओळखा.
विहार म्हणजे :-
०१) चालणे
०२) संचार
०३) उड्डाण
०४) पळणे
उत्तर - संचार
दिलेल्या शब्दांचा अचूक अर्थ त्यापुढील पर्यायांतून ओळखा.
वियोग म्हणजे :-
०१) जवळ असणे
०२) रडू येणे
०३) विजय
०४) विरह
उत्तर - विरह
दिलेल्या शब्दांचा अचूक अर्थ त्यापुढील पर्यायांतून ओळखा.
दुर्लभ म्हणजे:-
०१) मुश्किल
०२) अलभ्य
०३) दुर्मीळ
०४) सहज
उत्तर - दुर्मीळ
दिलेल्या शब्दांचा अचूक अर्थ त्यापुढील पर्यायांतून ओळखा.
बस्तान म्हणजे :-
०१) ठिय्या
०२) याचक
०३) वेदना
०४) संवेदना
उत्तर - ठिय्या
#Sangita_Bhalsing
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.