११ वी व १२ वी भूगोल अभ्यासाचे महत्त्व -
भूगोल हा केवळ नकाशे, नद्या किंवा पर्वतांचा,दगडांचा विषय नसून मानव व निसर्ग यांच्यातील संबंधांचा अभ्यास करणारा महत्त्वाचा विषय आहे. ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल विषय समजून अभ्यासणे अत्यंत उपयुक्त ठरते
शैक्षणिक दृष्टीने भूगोलाचे महत्त्व -
भूगोल विषयामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, विश्लेषण क्षमता व तर्कशुद्ध विचार विकसित होतो.आजच्या टेक्नॉलॉजी च्या जगात नकाशे, आकृत्या व उदाहरणांमुळे विषय समजायला सोपा जातो आणि बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवण्यास मदत होते.
निसर्ग व पर्यावरणाची जाणीव -
भूगोलाच्या अभ्यासातून हवामान बदल, जलसंधारण, मृदा संवर्धन, पर्यावरण रक्षण व संवर्धन ,वनसंवर्धन यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळते. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जबाबदारीची भावना निर्माण होते.
वर्तमान घडामोडी समजण्यासाठी उपयुक्त -
पूर, दुष्काळ, ज्वालामुखी,भूकंप, चक्रीवादळे, जागतिक तापमानवाढ, नैसर्गिक व मानवी आपत्ती अशा घटनांचे कारण व परिणाम समजून घेण्यासाठी भूगोल विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्तमान घडामोडी चांगल्या प्रकारे समजू शकतात. आपत्तीकाळात काय करावे किंवा करू नये याची माहिती कळते.
स्पर्धा परीक्षांसाठी आधार -
MPSC, UPSC, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, वनसेवा अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये भूगोल विषयाला विशेष महत्त्व आहे. ११–१२ वी भूगोल हा पुढील अभ्यासाचा मजबूत पाया ठरतो. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत भूगोलाचे प्रश्न असतातच.
करिअरच्या संधी -
भूगोल विषय घेऊन पुढे विद्यार्थी:
GIS व Remote Sensing तज्ञ
पर्यावरण तज्ञ
शहरी नियोजन (Urban Planning)
शिक्षक व प्राध्यापक
प्रशासकीय अधिकारी
अशा विविध क्षेत्रात करिअर करू शकतात.
दैनंदिन जीवनातील उपयोग -
हवामान अंदाज, शेती नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन, प्रवास व नकाशा वाचन यासाठी भूगोलाचे ज्ञान प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडते.
निष्कर्ष -
११ वी व १२ वी भूगोलाचा अभ्यास हा निसर्ग समजून घेण्यासाठी, पर्यावरण जपण्यासाठी आणि भविष्याची तयारी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे भूगोल विषय मन लावून व समजून अभ्यासणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.