मराठी लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ७ जून, २०२६

संयमाचे संस्कार : जुन्या काळातील जीवनमूल्यांची आठवण

 #संयम

संयमाचे संस्कार : कालातील जीवनमूल्यांची आठवण....

लेन - संगिता भालासिंग

"जुन्या काळातील मुले एकत्र बसून खाऊ वाटून खाताना आणि आजची मोबाईलमध्ये गुंतलेली इन्स्टंट पिढी – संयमावरील मराठी लेख."


आमच्या गुण लहानपणापासून संयम याचा नकळत विकास, बालपणापासून अनेक गोष्टी मनाला शिकलो. वाट पहायला शिकलो आम्ही. .... धीर धरणे हा शब्द वापर अक्षरशः जगलो आम्ही.


उदा. सणवार आले की सोचे घर सुगंधाने दरवळत असे, सर्व पदार्थ देवाला नैवेद्य शोधून, उष्टे आहेत, नवीन देवाला शोधून चांगले दिवस बघून घालणे, नवीन कपची घडी मोडणे हा एक असे जणूकाही. यात एक विशेष बाब की, आपले नविन असे कोणाला तरी घडले मोडी काढणे ....खूप मानाचे, आचेंदे स्त्री किंवा बाहेरील मैत्रीण, बहीण प्रिय... नवीन साची घडी मोडायला मिळते.

टाकाचला आपण निसर्ग पदार्थ करतो, असे मला वाटत असेल तर काही ताबडतोब वाटत नाही, जे ताबडतोब, ते मुकाट खावे लागेल. कोणताही हट्ट फारसा पुरविला जात नाही. ही गोष्ट वाचली नसे,पालक अधिकारी नाही तर आम्ही देखील पचवायला शिकलो! 


अन्न,व,निवारा,आरोग्य,शिक्षण अशा मूलभूत बाबींमधे तडजोडत्व शिकलो.

आठवडी बाजारातून खाऊ आणणे, आईवडील त्या खाऊचे सर्व समान वाटप करत आहेत, एक मूल त्या खाऊ ला हात लावत नाही. सर्व जण लोक तो खाऊ खात एकट्याने खाण्याची प्रथा.

शेअरिंग......आपण असे होत.शिकवण्याची गरज. 

वह्या,पुस्तके, पाटी,पेन्सिल आणि दप्तर ही विश्लेषणे वापरत आहेत. अंथरूण पांघरूण ही एकत्रच.

सामायिक करणे हे काळजी घेणे आहे आज मार्गदर्शन करणे, आम्ही सुरक्षित जगलो आहोत.

त्याच्या नावे त्याची बॉटल ने त्याची प्रथा.,किहुना घाऊबॉटल च नसतंशाळेत नळकळचे पाणी प्यायचो.

म्हणजे अधेमधे तहान लागली तर सुट्टी होण्याची वाट पाहायची, मन मारायची ,संयम ठेवायची सवय लागली. आणि आज मुलं तास चालू असताना टीचर बॉटल लावतात.


खरे तर आपल्या संचाचा आपल्याला जीवनात खूप फायदा झाला आहे याची आता खूप इच्छा होती, मात्र हाच संयम आपल्याला पुढच्या लोकला नाही शिकवू शकलो ही खंत वाटते.


त्यांना 'दोमिनीट' ही सवय सवय... इन्स्टंट पदार्थ खायची सवय, इन्स्टस्ट जगत ची सवय सवय.

"इन्स्ट जमान्यातील इंस्टंट ब्लॉक"

घडवली आपण....! आजची उमेदवार वापरा आणि टाका हे मात्र मला वाटते शिकली.


याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट आमच्यासाठी मनोरंजनाची साधनेही होती. दूरदर्शनवर कौतुक आवडता कार्यक्रमाची त्याची आठवडाभर पाहावी लागेल. रविवारच्या फांदीसाठी किंवा "चित्रहार" साठी घरातील सर्व एकत्र बसतात. जोडणी भाग चुकला तर पुन्हा पाहण्याची सोय. आपण पाहणे, आर्थिक गोष्टींची किंमत समजणे आणि उपलब्ध आनंदाचा अनुभव आपण शिकला.

पत्र लिहिले उत्तर येण्यासाठी अनेक दिवस वाटावे लागतील. भेटीची भेट मनापासून गप्पा रंगत असते. आजच्या सारखे क्षणक्षणाला संदेश, कॉल किंवा सोशल मीडियाची सोय. आपला माणूस नात्यामध्येही संयम आणि जिव्हाळा अधिक होता.

शिक्षणाचे वातावरणही तेच. कालचा निकाल वर्तमानपत्रात किंवा फळाच्या फलकावर लागेपर्यंत धीर धरावा लागेल. आज एका क्लिकवर सर्व माहिती. पण त्या प्रतीक्षेतून उत्पादना आनंद काही असे.

खेळणी, घडाळा, घड्याळ किंवा नवीन दृश्ये समोरच्या गोष्टी घडत नाहीत. दिशा, सण किंवा विशेष उदाहरणाची वाट पाहावी लागेल. अशा गोष्टींची किंमत कळते. आज अनेक वस्तु सहज उपलब्ध त्यांचे अप्रूप संपते.

संयम केवळ इच्छा आवरणे नाही, तर परिस्थिती स्वीकारणे, मोठ्या प्रमाणात विचार करणे, आपली पाळी येईपर्यंत हे घडणे आणि गोष्टींबद्दल कृतज्ञ राहणे आम्ही शिकलो. कदाचित त्या काळातील साधनांमध्ये कमीही अधिक समाधानी होती.

आजच्या लोकांकडे ज्ञान, तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राचा अमाप खजिना आहे. त्यांना प्रतीक्षा करा आणि समाधान फक्त योग्य समजले, तर आधुनिक जीवनातील समतोल साधता येईल.

कारण संयम म्हणजे मागासलेपण, तर योग्य उमेदवाराची वाट पाहण्याची संधी आहे. आणि ज्याच्याकडे ही असते, तो आपल्यातील अनेक वादळांना शांतपणे सामोरा जाऊ शकतो.

वेगवान युगात सर्व काही आज, पण पाहण्याची सवय हरवत चालली आहे. वस्तुस्थिती सांगणे, पण त्यांची किंमत जाणणे मोठे आहे. पुढील पुढीलला संपत्तीपेक्षा संयमाचा वारसा देणे अधिक फायदा आहे.

कालाय तस्मै नमः

संगिता भालासिंग

अहमदनगर

"एक आनंद असतो, हे पाहणारे लोक जगून अनुभवले आहेत. आज सर्व काही एका क्लिकवर उघड, पण संयम शिकवते ते दिवस पुन्हा मिळत नाहीत..."

#संयम #मराठीलेख #जुन्याआठवणी #बालपण #संस्कार #मराठीब्लॉग #SangitaBhalsing #LifeLessons #SharingIsCaring #MarathiWriter

मंगळवार, १९ मे, २०२६

एक सुंदर अनुभव

“मोठेपण पदात नसते, तर विचार आणि कृतीमध्ये  असते…”
घरात एक डॉक्टर स्वतः फरशी पुसत आहेत, तर मागे उभी असलेली महिला हसत त्यांच्याकडे पाहत आहे. भिंतीवर स्त्री-पुरुष समानता, घरकामात सर्वांचा सहभाग आणि कोणतेही काम लहान नसते असा संदेश लिहिलेला आहे.



आजकाल आपण एखाद्या डॉक्टर, वकील,अधिकारी किंवा मोठ्या पदावरील व्यक्तीबद्दल एक ठराविक प्रकारची प्रतिमा मनात तयार करून ठेवतो.
त्यांच्याकडे सर्व कामांसाठी माणसं असतील, ते स्वतः घरकाम करत नसतील, अशी एक समजूत असते. त्यांना वेळ नसेल किंवा आवड नसेल.....

पण काही प्रसंग असे असतात, जे आपल्या विचारांनाच नवी दिशा देऊन जातात.

असाच एक अनुभव मला आला.
एका सकाळी अचानक मी माझ्या एका नातेवाईकांच्या घरी गेले. ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. समाजात मान-सन्मान असलेले, व्यस्त आणि खूप जबाबदारीचे काम करणारे व्यक्तिमत्त्व. अगदी तरुण असणारा डॉक्टर मुलगा ....

मी घरात गेले आणि जे दृश्य पाहिले, ते पाहून काही क्षण मी थबकलेच…

ते स्वतः हातात पोछा घेऊन फरशी पुसत होते. घर स्वच्छ करत होते.
अतिशय साधेपणाने, कोणताही दिखावा न करता.
क्षणभर मला आश्चर्य वाटले.
पण लगेच त्या दृश्याने माझ्या मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला.

कारण खरे मोठेपण हे पद, पैसा किंवा प्रतिष्ठेत नसते…
तर विचारांत, संस्कारांत आणि वागण्यात असते.
आपल्या समाजात अजूनही घरकामाकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे बदललेली नाही.
घर साफ करणे, भांडी धुणे, कपडे धुणे, स्वयंपाक करणे — ही कामे फक्त स्त्रियांचीच आहेत, अशी जुनी मानसिकता अजूनही अनेक ठिकाणी दिसते.
पुरुषांनी घरकाम केले तर काहींना आश्चर्य वाटते, तर काहींना ते कमीपणाचे वाटते.
पण खरं पाहिलं तर घर हे फक्त एका व्यक्तीचे नसते.
ते संपूर्ण कुटुंबाचे असते.
मग त्याची जबाबदारीही सर्वांनी मिळून घेतली पाहिजे.
आजच्या काळात स्त्री-पुरुष समानता ही फक्त बोलण्यापुरती न राहता कृतीत उतरली पाहिजे.
स्त्री बाहेर काम करू शकते, जबाबदाऱ्या सांभाळू शकते, तर पुरुषांनीही घरकामात सहभाग घेणे हे तितकेच नैसर्गिक आणि आवश्यक आहे.
कोणतेही काम हे कमीपणाचे नसते.
कामाची लाज बाळगणे हेच खरं तर चुकीचे आहे.
स्वतःची खोली आवरणे, घर स्वच्छ ठेवणे, स्वयंपाकात मदत करणे, मुलांची काळजी घेणे — ही सर्व कामे “स्त्रीची” किंवा “पुरुषाची” नसून “घराची” कामे आहेत.
आजची धावपळीची जीवनशैली पाहता, एकमेकांना मदत करणे ही काळाची गरज बनली आहे.
घरात सर्वांनी कामांची विभागणी केली, तर फक्त काम हलके होत नाही…
तर नात्यांमध्येही आपुलकी, आदर आणि समज वाढते.
त्या डॉक्टर नातेवाईकांचा तो साधा प्रसंग मला खूप काही शिकवून गेला.
शिक्षण म्हणजे फक्त मोठी पदवी नव्हे…
तर माणुसकी, नम्रता आणि समानतेची जाणीवही आहे.
समाज खऱ्या अर्थाने प्रगत तेव्हाच होईल,
जेव्हा घरकाम करणाऱ्या हातांकडे कमीपणाने पाहिले जाणार नाही…
आणि “हे माझे काम नाही” याऐवजी
“हे आपले घर आहे” ही भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल.
कारण शेवटी —
मोठेपण हे आपण किती उंच गेलो यात नसते,
तर जमिनीशी किती जोडलेले राहिलो यात असते.
थोडक्यात,
वरील घटनेवरून पुढील निष्कर्ष
निघू शकतात .

डॉक्टर असूनही स्वतः फरशी पुसणारे नातेवाईक… मोठेपणाचा खरा अर्थ!

“हे माझं काम नाही” ऐवजी “हे आपलं घर आहे” — एक सुंदर अनुभव

स्त्री-पुरुष समानतेचा खरा अर्थ शिकवणारा प्रसंग

घरकामाची लाज नाही — एका डॉक्टरांनी दिलेला मोठा संदेश

मोठेपण पदात नाही, तर साधेपणात असते

घरकामात सर्वांचा सहभाग का आवश्यक आहे?

स्वतः फरशी पुसणारे डॉक्टर पाहून मला काय शिकायला मिळाले ... स्वावलंबन 

काळाची गरज — घरकामात स्त्री-पुरुष समान सहभाग

कोणतेही काम लहान नसते — प्रेरणादायी अनुभव

शिक्षण म्हणजे फक्त पदवी नाही, तर संस्कारही आहेत.

प्रा सौ संगिता भालसिंग 
अहिल्यानगर

#मराठीलेख #स्त्रीपुरुषसमानता #घरकाम #प्रेरणादायी #मराठीब्लॉग #सकारात्मकविचार #कुटुंब #संस्कार #ModernThinking #Equality #MarathiBlog #Motivation

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

गुळणा-गुळणी… जुने ते सोने

 गुळणा-गुळणी… जुने ते सोने - मराठी लेख 

किती सुंदर चित्र…

किती हृद्य प्रसंग…

नववधू आणि वर—

मराठी विवाहातील गुळणा-गुळणी परंपरा – नववधू आणि वर यांचा प्रेमळ खेळ


एकमेकांची अजिबात ओळख नाही.

फक्त एकदाच, दूरून घेतलेली क्षणिक नजर…

प्रेम, प्रेमपत्र, बिमं-किमं यांचा प्रश्नच नाही.

लग्न ठरल्यानंतर भेटी अशक्यच.

फोन कॉल? मेसेज?

तो काळच नव्हता.

मग एकमेकांना ओळखायचं तरी कसं?

संकोचाचा पडदा गाळायचा तरी कसा?

म्हणूनच आपल्या पूर्वजांनी शोधलेले हे

सुंदर, प्रेमळ आणि खोडकर उपाय…

गुळणा-गुळणी!

विवाहानंतरची पहिली आंघोळ—

अंगावर चूळ भरून पाणी उडवणे,

हसत-खेळत खोड्या काढणे…

कंकण सोडविणे,

पाण्यात अंगठी शोधण्याचा खेळ…

त्या निमित्ताने नकळत हातांचा स्पर्श,

डोळ्यांत लाज, ओठांवर हसू…

ना शब्दांची गरज,

ना मोठ्या अपेक्षा—

फक्त साधेपणा, निरागसपणा आणि मनापासूनची जवळीक.

खरंच…

ते दिवस आता गेले.

उरल्या आहेत फक्त आठवणी…

आजच्या पिढीला कदाचित या गोष्टी

हास्यास्पद, वेड्या वाटतील.

पण ज्यांनी हा अनुभव मनापासून जगला आहे,

त्यांच्या संसाराला फिफ्टी पूर्ण झालेली

असण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे…

कारण त्या नात्याची पायाभरणी

भौतिक साधनांवर नाही,

तर संयम, समज, प्रेम आणि परंपरेवर

झालेली होती.

जुने ते सोनेच…!

— Sangita Bhalsing

Ahilyanagar Maharashtra 

Post आवडल्यास नक्की शेअर करा.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...