vyakaran लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
vyakaran लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

मराठी व्याकरण इयत्ता ११ वी

 मराठी व्याकरण इयत्ता ११ वी

१) शब्दशक्ती 

शब्दशक्ती म्हणजे काय?

शब्दशक्तीचे प्रकार कोणते? 

शब्द शक्तीचे उदाहरणे.

खाली दिलेल्या यू ट्यूब व्हिडिओ ची लिंक क्रोम ब्राउझर मध्ये ओपन करा.

https://youtu.be/xHjsxQd40gs

व्हिडिओ पाहून तुमच्या काही शंका, सूचना असल्यास कमेंट करून सांगा.
योग्य ते मार्गदर्शन केले जाईल.

Sangita Bhalsing 
Ahilyanagar, Maharashtra 


रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

मराठी व्याकरण रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

१.व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.


०१) परी
०२) पांढरा
०३) परीस
०४) पारा

उत्तर - पांढरा

२.व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) आम्ही
०२) तुम्ही
०३) सर्व
०४) आपण

उत्तर - सर्व

३. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) गोरस
०२) गोरा
०३) गोरटेला
०४) भुरा

उत्तर - गोरस

४. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) असे
०२) तसे
०३) ससे
०४) जसे

उत्तर - ससे

५. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) ने
०२) आण
०३) येतो
०४) पाठव

उत्तर - येतो

६. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) येणे
०२) जाणे
०३) खाणे
०४) गाणे

उत्तर - गाणे

७. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) शाळेत
०२) शाळेजवळ
०३) शाळेपाशी
०४) शाळेकडे

उत्तर - शाळेत

८. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) काल
०२) काळ
०३) उद्या
०४) आज

उत्तर - काळ

९. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१)किंवा
०२) अथवा
०३) वार
०४) वा

उत्तर - वार

१०. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) अभ्यास
०२) शाब्बास
०३) इश्श
०४) अरेरे

उत्तर - अभ्यास

Sangita_Bhalsing
Ahilyanagar, Maharashtra 

मराठी व्याकरण -विशेषण

विशेषण ओळखा - विशेषण 

प्रश्न १. पुढील नामासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य विशेषणे वापरा.

१.लाडू:-

०१) तुरट
०२) तिखट
०३) गोड
०४) कडू

उत्तर - गोड

२.जेवण :-

०१)चमचमीत
०२) चकचकीत
०३) टळटळीत
०४) करकरीत

उत्तर - चमचमीत

३. किरण :-

०१) टपोरे
०२) कोवळे
०३) घुवाधार
०४) मुसळधार

उत्तर - कोवळे

४.रान :-

०१) निळेशार
०२) मंद
०३) हिरवेगार
०४) पिवळेधमक

उत्तर - हिरवेगार

५. मूल :-

०१) कठीण
०२) सौम्य
०३) कर्कश
०४) गोजिरवाणे

उत्तर - गोजिरवाणे

६. फूल :-

०१) सामासिक
०२) राजकीय
०३) सुवासिक
०४) भरजरी

उत्तर - सुवासिक

७. माती :-

०१) दमदार
०२) कसदार
०३)मजेदार
०४) बहारदार

उत्तर - कसदार

८. कुत्रा :-

०१) टनटणीत
०२) मऊ
०३) हिरवट
०४) इमानी

उत्तर - इमानी

९. लोक :-

०१) चावरे
०२) हौशी
०३) कातीव
०४) पांढरेशुभ्र

उत्तर - हौशी

१०. कपडे :-

०१) शहाणे
०२) वेडे
०३) सुंदर
०४) बावळट

उत्तर - सुंदर

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
Sangita_Bhalsing


New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...