बुधवार, १० फेब्रुवारी, २०१६

टेडी बिअर

🌷 टेडी बिअर 🌷

टेडी रे टेडी, तू
दिसतो किती छान ...?
घराघरात सर्वत्र तुला
सिंहासनाचे स्थान ...!!

सर्वांचा तू लाडका,
वाटे खूप हवाहवासा
मुले मात्र करतात तुझा
जीव खूप नकोनकोसा ...!!

पांढरी शुभ्र मऊ मऊ
गुबगुबीत तुझी कुशी
आरामात लोळायला
डोक्याखाली तूच उशी ...!!

हवे तसे तुझ्याशी खेळून
देतात कुठेही फेकून
सुंदर कपडे जातात
चिखल मातीने मळून ...!!

आईला येते तुझी किव
वाळत घालते धुवून
सोडविते त्रासातुन
तुला कपाटात ठेवून ...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रा. सौ.संगिता भालसिंग

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

सावळा विठ्ठल

जय हरी विठ्ठल ....!!

सावळ्या विठुची
लागलीसे गोडी
जीव ओढ़ाओढी
पंढरीशी ...

सौ.संगिता भालसिंग

आई

कविता=11
~~~~~~~~~~
आई
************
आई ही आई असते
देवा घरी गेली तरी
ती आपल्याला दुरुन
पहात असते ....
ती कधी विसरत नाही
आपल्या पोटच्या बाळाना ..
ती भिंतीवर फोटोत असते
घरभर तिची नजर असते
प्रेमपान्हा सोडत असते
आशिष देत असते
आपल्या हातून जेवढी
सेवा घडते ...भाग्य आपले ...
तिच्या आठवणी जपत
संस्कार आठवत
आनंदी जगायचे असते
तिच्या फोटोच्या फुलांच्या
सुवासात अनुभवायचे असते
ती गेली म्हणू नये
आसू आणु नये
मुक्त होऊ दे आत्मा
शांतता मिळू दे
येणे अणि जाणे
चुकले नाही कुणा
शिका जगायला
तिच्या वीना ...
तिच्या वीना ...
**************
सौ.संगिता भालसिंग

चॉकोलेट डे

आज सर्वजण
होतील वेडे ....
करुन साजरा
चोकोलेट डे ....!!

सकाळी  दादाला
चोकोलेट मागितले ...
मला नाही दिले
पण तिलाच दिले ...!!

ती नकटया नाकाची
गोबऱ्या गालाची ...
पापी घेते माझ्या
गोल गोड गालाची ...!!

रागाने पाहतो तिला
नि पुसून टाकतो ...
दोघांच्या गुपिताला
आता फोडून टाकतो ...!!

सौ.संगिता भालसिंग

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६

चेहरे अणि मुखवटे

|| चेहरा अणि मुखवटा ||

चेहरे अन मुखवटे
किती यात फरक ?
चेहरा प्रेमाला तारक तर
मुखवटा प्रेमाला मारक

चेहरा पाहून पालवी फूटे
मुखवटा पाहून पालवी गळे
चेहरा पाहून पापणी फुले
मुखवटा पाहून पापणी झूले

चेहरा पाहून आनंद वाटे
मुखवटा पाहून दुःख भेटे
चेहरा पाहून धन्यता वाटे
मुखवटा पाहून हीनता वाटे

चेहरे कधी बदलत नाहीत
मुखवटे कायम राहत नाहीत

सौ.संगिता भालसिंग

भक्तीसुधा

१.
सावळया विठ्ठला
केलीस करणी
लागला झुरणी
जीव माझा ...

सौ.संगिता भालसिंग

चल सखी

🌷 चल सखी 🌷

चल सखी,
जरा गुजगोष्टी बोलू
काळजाची पटले
जराशी खोलू ...

तो रवि उगवला
आकाशीच्या प्रांगणात
किरणांच्या उबेला
दवबिंदुवर चालू ...

हिरवी धरती जागली
पाखरांचा किलबिलाट
काळ्या कोकिळेच्या
मंजुळ गाण्यावर डोलू

सुखादुखाची डहाळी
झूलते मंद वाऱ्यात
भावनांच्या हिंदोळ्यावर
झोके जरासे झुलु ...
****************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
31/01/16

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...