🌷 टेडी बिअर 🌷
टेडी रे टेडी, तू
दिसतो किती छान ...?
घराघरात सर्वत्र तुला
सिंहासनाचे स्थान ...!!
सर्वांचा तू लाडका,
वाटे खूप हवाहवासा
मुले मात्र करतात तुझा
जीव खूप नकोनकोसा ...!!
पांढरी शुभ्र मऊ मऊ
गुबगुबीत तुझी कुशी
आरामात लोळायला
डोक्याखाली तूच उशी ...!!
हवे तसे तुझ्याशी खेळून
देतात कुठेही फेकून
सुंदर कपडे जातात
चिखल मातीने मळून ...!!
आईला येते तुझी किव
वाळत घालते धुवून
सोडविते त्रासातुन
तुला कपाटात ठेवून ...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रा. सौ.संगिता भालसिंग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.