गुरुवार, ३ मार्च, २०१६

ख़ुशी

.......द्वितीय क्रमांक प्राप्त चारोळी .....
...............................................................
***************************
कौलारु घरांचे चिमुकले भाविक गांव
वसलेय हिरव्या डोंगराच्या कुशीत ..
भाकरी बांधून, कष्टाळु गाढवं घेऊन
चारायला निघालोय खुप खुशीत ..
***************************
सौ.संगिता भालसिंग
1/3/15

बुधवार, २ मार्च, २०१६

गुढी

*माझ्या रचनेला द्वितीय क्रमांक प्राप्त
............................................................
पाळुनी पारंपरिक रूढी
घडवू या रे नविन पिढी ....
आनंदाचा कलश घेऊनी
उभारु नवचैतन्याची गुढी .....
..............................................................
सौ.संगिता भालसिंग
19/3/15

वसंत

🌹 वसंत ऋतू 🌹

शिशिर गेला , वसंत आला
ऋतुराज म्हणतात त्याला ...

पहा आम्रतरु बहरला
धुंदगंध आंबे मोहराला ...

कंठ फुटे गान कोकिळेला
ताल कर्णमधुर गाण्याला ...

नवती आली, पानापानाला
सुंदरता हिरव्या रंगाला ...

किलबिल पक्षी सावलीला
नवरूप आले धरतीला ...

आनंदाचे उधाण मनाला
चला,नववर्ष स्वागताला ...

तोरण बांधू घरादाराला
रंगीत नववस्त्र गुढीला ...

देऊ आमंत्रण होलिकेला
दुष्ट परंपरा जाळायला ...

जुन्या नव्याची सांगड घाला
चला,वसंतात रंगायला ...

**************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग

११/०२/१६

वसंत ऋतू

🌹 वसंत ऋतू 🌹

शिशिर गेला , वसंत आला
ऋतुराज म्हणतात त्याला ...

पहा आम्रतरु बहरला
धुंदगंध आंबे मोहराला ...

कंठ फुटे गान कोकिळेला
ताल कर्णमधुर गाण्याला ...

नवती आली, पानापानाला
सुंदरता हिरव्या रंगाला ...

किलबिल पक्षी सावलीला
नवरूप आले धरतीला ...

आनंदाचे उधाण मनाला
चला,नववर्ष स्वागताला ...

तोरण बांधू घरादाराला
रंगीत नववस्त्र गुढीला ...

देऊ आमंत्रण होलिकेला
दुष्ट परंपरा जाळायला ...

जुन्या नव्याची सांगड घाला
चला,वसंतात रंगायला ...

**************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
११/०२/१६

स्वप्नभास

***************************
हे स्वप्न सुंदरी,प्राण प्रिये
झालोय ग मी तुझा दास ....
होणार तर नाही न दुरावा
छळतो मज हा स्वप्नभास ...
***************************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
1/3/15

जाग विठ्ठला

🌷 जाग विठ्ठला 🌷

विठू जरा जाग
पहा बळी कडे
दुष्काळ कोरडे
दश दिशा ...

विठुचे अभंग
भासती कोरडे
दुष्काळी ओरडे
बळीराजा ...

गोठ्यातली गाय
थरथर कांपे ..
सुकलेली रूपे
दावणीला ...

वसणे फाटली
भुकेलेली मुले
खपाटीला गेली
पाठ पोट ...

घराची लक्षुमी
उदासले मुख
लपविती भूक
हसुनिया ...

कष्टती जोडीने
पावसाची वाट
सपनाचा घाट
बांधतसे ...

अजूनही जागी
मनातली आशा
झटकी निराशा
तुझ्या पायी ...

पहिला नवस
तुझ्या चरणाशी
दे रे जरा आशिष
विठूराया ...

सौ.संगिता भालसिंग

मंगळवार, १ मार्च, २०१६

नाव

नजरेत तुझ्या दिसे
गोड आतूर भाव ....
नयनी कोरले जसे
खोडकर कान्हाचे नाव ...

संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...