🌷 जाग विठ्ठला 🌷
विठू जरा जाग
पहा बळी कडे
दुष्काळ कोरडे
दश दिशा ...
विठुचे अभंग
भासती कोरडे
दुष्काळी ओरडे
बळीराजा ...
गोठ्यातली गाय
थरथर कांपे ..
सुकलेली रूपे
दावणीला ...
वसणे फाटली
भुकेलेली मुले
खपाटीला गेली
पाठ पोट ...
घराची लक्षुमी
उदासले मुख
लपविती भूक
हसुनिया ...
कष्टती जोडीने
पावसाची वाट
सपनाचा घाट
बांधतसे ...
अजूनही जागी
मनातली आशा
झटकी निराशा
तुझ्या पायी ...
पहिला नवस
तुझ्या चरणाशी
दे रे जरा आशिष
विठूराया ...
सौ.संगिता भालसिंग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.