सोमवार, ७ मार्च, २०१६

स्वप्न

चारोळी स्पर्धा -प्रथम पुरस्कार प्राप्त

काल पेरलेली स्वप्नं जळाली ,

उरी खोलवर अबोल घाव ...!!

आज मिळाली नवी उभारी ,

मांडला पुन्हा मी नवा डाव ...!!

***********************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

होळी

** प्रथम क्रमांक प्राप्त चारोळी **
      मन अथांग सागर ग्रुप
*****************************************
बालकांची निघाली रे टोळी
बोंब मारीत "होळी रे होळी " ...
नैवेद्य दाखवुन पुरण पोळी
अन् सासूरूपी कचरा जाळी ...
*****************************************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
6/3/15

कन्या

नको मारूआई, मला पोटात
येऊ दे अंगाई ,तुझ्या ओठात
दुडुदुडु धावू दे,पाऊल घरात
धडधड होऊ दे,तुझ्या उरात ...

सौ.संगिता भालसिंग

आनंदाचा झरा

आनंदाचा झरा, वाहू दे दारात
चिंबचिंब भिजू दे,मायेच्या पुरात ...
किलबिल सुर, घुमू दे कानात
गोडगोड वाहू दे,प्रेम तुझ्या मनात ...

सौ.संगिता भालसिंग

होलिका

** विजयाची हैटट्रिक **
*** प्रथम क्रमांक प्राप्त चारोळी ***
*****************************************
जात,धर्म,पंथ,वेष,भाषा विसरून
विविधतेत एकता जगाला दावू ...
होलीकेत दहन करू सारे दुर्गुण
चला रंगात सारे रंगून जावू ...
******************************************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
5/3/15

सल

🌷 सल 🌷

मनाच्या जखमा
सलत्या वेदना
दूर का होईना ?
प्रश्न मनी ...!!

देवाचा चौथरा
दुरुन पाहते
मज्जाव साहते
भेदाभेद ...!!

कोणी ठरविले ?
देह अपवित्र
निर्मिती पवित्र
जननीची ...!!

विखारी नजरा
टोचती मनाला
सांगावे कुणाला ?
उमजेना ...!!

चंदनाचा टीळा
लाविते मी भाळा
नजरेच्या ज्वाळा
 थंडावती ।।
******************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
०७ मार्च २०१६
Spsfun.com
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सुप्रभात
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

विशेष टिप🙏
रचना आवडली तर नावासह
पुढे पाठवा ...!!

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

टिळा

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...