🌷 सल 🌷
मनाच्या जखमा
सलत्या वेदना
दूर का होईना ?
प्रश्न मनी ...!!
देवाचा चौथरा
दुरुन पाहते
मज्जाव साहते
भेदाभेद ...!!
कोणी ठरविले ?
देह अपवित्र
निर्मिती पवित्र
जननीची ...!!
विखारी नजरा
टोचती मनाला
सांगावे कुणाला ?
उमजेना ...!!
चंदनाचा टीळा
लाविते मी भाळा
नजरेच्या ज्वाळा
थंडावती ।।
******************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
०७ मार्च २०१६
Spsfun.com
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सुप्रभात
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
विशेष टिप🙏
रचना आवडली तर नावासह
पुढे पाठवा ...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.