सोमवार, ७ मार्च, २०१६

मैत्री

🌷 चारोळी स्पर्धा 🌷
  🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🌻 मन अथांग सागर समूह 🌻
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

प्रथम क्रमांक प्राप्त
****************

विश्वासाच्या घडीव मनावर

स्नेहाचे सुंदर कोरीव लेणे

क्षणभंगुर जीवन प्रवासात

मैत्रीवीना व्यर्थ मानव जीणे

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
१६/०१/१६

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

ग्रंथ

शाहीर काव्यमंच
स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त रचना ...!!

'ग्रंथ हेच गुरु" जाण
देई जीवनाला प्राण..
जगी ज्ञानालाच मान
वाचू पुस्तकाचे पान ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग

शब्द

शब्द जोडणारे
शब्द तोड़णारे !!

शब्द मारणारे
शब्द तारणारे !!

शब्द लिहिणारे
शब्द वाचणारे !!

शब्द हरणारे
शब्द जिंकणारे !!

शब्द फुलवणारे
शब्द सुकवणारे !!

शब्द पेटवणारे
शब्द विझवणारे !!

शब्द फुलवणारे
शब्द झुलवणारे !!

शब्द सुखावणारे
शब्द दुखावणारे !!

शब्द जाळणारे
शब्द पोळणारे !!

शब्द हसवणारे
शब्द रडवणारे !!

शब्द घुसमटणारे
शब्द मुसमुसणारे !!

शब्द फेकणारे
शब्द झेलणारे !!

शब्द काप णारे
शब्द सांधणारे !!

शब्दच देतात आठवणी
अन
शब्दानेच तरळते
     डोळयात पाणी !!

म्हणूनच ..

शब्द शब्द जपून टाक
    बकुळीच्या फुला  !!!

सौ.संगिता भालसिंग

स्त्री-पुरुष

तृतीय क्रमांक प्राप्त रचना -

01
करू नको कधी
नारीशी तू स्पर्धा ...
हे नरा तू आहेस
नारी विना अर्धा ....
***************
02
माझ्या मनाच्या व्यथा
मी सांगू कशाला ...?
शांत निद्रा येईल
घेऊन व्यथा उशाला ...
*************
03
मनाच्या व्यथेचा
नका बडवू ढोल ...
जगाच्या बाजारी
व्यथेला नसे मोल ...
***********
04
गाऊ नका रे
व्यथेची कथा ...
व्यथेला नसे रे
कोणी त्राता ..
**************
05
चुकलेल्या नात्याला
सखे सावरु ग जरा ...
माझा जीव अडकला
सुखी संसारात सारा ....
*************
06
प्रेयसी वाटे जरी आस
पण आहे तो खराफास ...
नका येऊ जरा घाईत
बायकोच गळयातला ताईत ...
********************
07
पति पत्नी रथाची दोन चाके
नको एका चाकावर भार ...
पति पत्नी एकमेकांशी वाके
नाही होणार संसारांची हार ....
*************************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

3 जून 2015

डॉ.बाबासाहेब

फेसबुक वरील" आम्ही साहित्य वेडे "
या ग्रुप वर प्रजासत्ताक दिना निमित्त
घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेत
प्रथम क्रमांक प्राप्त रचना ....!!

बाबासाहेब,परत तुम्ही याल काय ....?

बाबासाहेब ,परत तुम्ही याल काय ?
घटनेची दुरुस्ती पुन्हा कराल काय ?
संसदेच्या सभागृहात बसा जरा
लोकशाहीचे वस्त्रहरण पहा जरा ||१||

इंग्रजी लोकशाही तुम्ही आणली
भारतीय वस्रात तिला सजवली
जाती धर्माच्या अलंकारानी सजवली
विविधतेत एकता गोडीने नांदवली ||२||

पण आता बदलाची गरज आहे
परिवर्तनाचा वारा वाहत आहे
जुने ते सोने किती दिवस म्हंणणार
जुन्या वाटेचे काटे टोचत राहणार ||३||

कधी कायदा धाब्यावर बसवतात
कायद्यातुन पळवाटा शोधतात
भ्रष्टाचाराचे पीक फार झोकात
शिष्टाचार संमत झालाय लोकांत ||४||

दुष्ट लोक जाती धर्माची तेढवाढ वतात
समाजउपयोगी योजना सडवतात
सभागृहात हाणामारी करतात
त्यानाच् लोक पुन्हा निवडून देतात ||५||

लोकशाही पैशात मोजतात
जनतेचे सुख दुख खरेदी विक्री करतात
लोकशाहीची थट्टा सांगू तरी किती ?
होईल आता "अति तिथं माती  "" ||६||

बाबासाहेब येता नाही आले तर
आशीर्वाद तरी दया आम्हाला
लोकांची मती होवो सुकर अन
देशाची प्रगती होवो लवकर ||७||

हा देश माझा अन मी या देशाचा
मांडला विचार मानव विकासाचा
वसो मनी भावना सदा देश प्रेमाची
हक्का पेक्षा जान ठेवा कर्तव्या ची ||८||
............................................................
* प्रा.सौ संगिता भालसिंग *
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
२३/०२/१५

झुलता बंगला

फेसबुक वरील
"आम्ही साहित्यवेडे समूह"

चारोळी स्पर्धेत द्वितीय पुरस्कार
  प्राप्त रचना ...

खोल विहिरी काठच्या झाडाला ,
झुलता बंगला बांधला ग बाई ...
संसार माझा रंगलेला,फुललेला ,
या मानवाची कशी होऊ उतराई ?

प्रा. सौ.संगिता भालसिंग
( देविका )

१६/१२/१४

नारी शिक्षण

ज्योतिंची क्रांतिज्योती,दूर करी अंधार

शेण गोळे झेली,तुझ्या लेखणीला धार

परिहार करण्या अन्याय अत्याचार

नारी शिक्षणाचे तूच खुले केले दार

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
प्रा. सौ.संगिता भालसिंग
(देविका)
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...