फेसबुक वरील" आम्ही साहित्य वेडे "
या ग्रुप वर प्रजासत्ताक दिना निमित्त
घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेत
प्रथम क्रमांक प्राप्त रचना ....!!
बाबासाहेब,परत तुम्ही याल काय ....?
बाबासाहेब ,परत तुम्ही याल काय ?
घटनेची दुरुस्ती पुन्हा कराल काय ?
संसदेच्या सभागृहात बसा जरा
लोकशाहीचे वस्त्रहरण पहा जरा ||१||
इंग्रजी लोकशाही तुम्ही आणली
भारतीय वस्रात तिला सजवली
जाती धर्माच्या अलंकारानी सजवली
विविधतेत एकता गोडीने नांदवली ||२||
पण आता बदलाची गरज आहे
परिवर्तनाचा वारा वाहत आहे
जुने ते सोने किती दिवस म्हंणणार
जुन्या वाटेचे काटे टोचत राहणार ||३||
कधी कायदा धाब्यावर बसवतात
कायद्यातुन पळवाटा शोधतात
भ्रष्टाचाराचे पीक फार झोकात
शिष्टाचार संमत झालाय लोकांत ||४||
दुष्ट लोक जाती धर्माची तेढवाढ वतात
समाजउपयोगी योजना सडवतात
सभागृहात हाणामारी करतात
त्यानाच् लोक पुन्हा निवडून देतात ||५||
लोकशाही पैशात मोजतात
जनतेचे सुख दुख खरेदी विक्री करतात
लोकशाहीची थट्टा सांगू तरी किती ?
होईल आता "अति तिथं माती "" ||६||
बाबासाहेब येता नाही आले तर
आशीर्वाद तरी दया आम्हाला
लोकांची मती होवो सुकर अन
देशाची प्रगती होवो लवकर ||७||
हा देश माझा अन मी या देशाचा
मांडला विचार मानव विकासाचा
वसो मनी भावना सदा देश प्रेमाची
हक्का पेक्षा जान ठेवा कर्तव्या ची ||८||
............................................................
* प्रा.सौ संगिता भालसिंग *
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
२३/०२/१५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.