बुधवार, ९ मार्च, २०१६

स्त्रीमुक्ति

मन अथांग सागर समूह

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

प्रथम क्रमांक प्राप्त रचना

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

स्त्री मुक्तिचे चर्वित चर्वण ,

पुरे आता,दया वाव कृतिला ...!!

टिकली बांगड़ीचं जीवन ,

थोडा मोकळा श्वास हवा तिला ...!!

**************************
सौ.संगिता भालसिंग
14/4/15
डॉ.बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

सबला नारी

उत्तेजनार्थ पारीतोषिक प्राप्त
**********************

     🌹सबला नारी 🌹

..................................................
अबला नारी नको , तर
सबला नारी बन तू ....

ज्योतिबांच्या सावित्री सारखी
क्रांतिज्योति बन तू ....

झाँशीच्या राणी सारखी
वीरांगना बन तू ....

इंदिरा गांधी सारखी
प्रियदर्शिनी बन तू ....

सिंधुताई सपकाळ सारखी
अनाथांची माई बन तू ....

शिवबाच्या जिजाऊ सारखी
राष्ट्रमाता बन तू ....

लता मंगेशकर सारखी
गानकोकिला बन तू ....

कल्पना चावला सारखी
गगन भरारी घे तू ....

थोर थोर स्त्रियांची
किती सांगू महती तुला ?

बन त्यांची प्रतिकृति
अंगीकारुन त्यांच्या गुणाला ...

स्वातंत्र्य अणि स्वैराचार
यातील फरक समज तू ..

स्त्री स्वातंत्र्याला मर्यादेचा
उंबरठा घाल तू ....

करियर पेक्षा कुटुंब श्रेष्ठ
हे विसरु नकोस तू ....

तुझ्याच ठायी सर्व गुणांचा वास असे
अन् पुरुष या गुणांचाच दास असे ...!!

************************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
3/3/15

बाळलीला

प्रथम क्रमांक प्राप्त रचना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

अमृतसुख भोगी बाळलीला मांडीवरी

नाच रे मोरा शिकवित सुखस्वप्न पाही

दळिता कांडिता सुसंस्कार करिते आई

नयनी अमृत हृदयी पाणी,दुःखही साही

****************************
सौ.संगिता भालसिंग
30/4/15

सागर किनारा

उत्कृष्ट रचना गौरव प्राप्त
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

🌻 भाव मनीचे 🌻
***********************

निवांत पहुडलेला सागरकिनारा ,

पांघरी निलमयी उबदार चादर ...!!

कधी वागे खोडकर मुलासारखा ,

लाट उचंबळुन जळ काढी बाहेर ...!!

***************************
सौ.संगिता भालसिंग
3/4/15

आई

द्वितीय क्रमांक प्राप्त रचना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

***********************
नयनी अमृत,हृदयी पाणी ,

रुसल्या बाळा घास भरविते ...!!

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत ,

तिला हवे तेच करवुन घेते ....!!

**********************
सौ.संगिता भालसिंग
16/4/15

बंदिस्त राजकन्या

प्रथम क्रमांक प्राप्त रचना
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बंदिस्त राजकन्या बोलत चंद्राशी ,

रात्रंदिन गवाक्षात उभी राहते ...!!

फूलपाखरासवे निरोप धाडूनि ,

चातकासम सख्याची वाट पाहते ...!!

**************************
सौ.संगिता भालसिंग
24/4/15

विसर

अप्रतिम रचना पुरस्कार प्राप्त
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

*********************

दिल्या घेतल्या वचनांचा सखे ,

अमर प्रीत करार मोडला ...!!

सांग कोणता गुन्हा घडला ...?

विसर असा का माझा पडला ...!!

*********************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
( देविका )
25/11/15

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...