उत्तेजनार्थ पारीतोषिक प्राप्त
**********************
🌹सबला नारी 🌹
..................................................
अबला नारी नको , तर
सबला नारी बन तू ....
ज्योतिबांच्या सावित्री सारखी
क्रांतिज्योति बन तू ....
झाँशीच्या राणी सारखी
वीरांगना बन तू ....
इंदिरा गांधी सारखी
प्रियदर्शिनी बन तू ....
सिंधुताई सपकाळ सारखी
अनाथांची माई बन तू ....
शिवबाच्या जिजाऊ सारखी
राष्ट्रमाता बन तू ....
लता मंगेशकर सारखी
गानकोकिला बन तू ....
कल्पना चावला सारखी
गगन भरारी घे तू ....
थोर थोर स्त्रियांची
किती सांगू महती तुला ?
बन त्यांची प्रतिकृति
अंगीकारुन त्यांच्या गुणाला ...
स्वातंत्र्य अणि स्वैराचार
यातील फरक समज तू ..
स्त्री स्वातंत्र्याला मर्यादेचा
उंबरठा घाल तू ....
करियर पेक्षा कुटुंब श्रेष्ठ
हे विसरु नकोस तू ....
तुझ्याच ठायी सर्व गुणांचा वास असे
अन् पुरुष या गुणांचाच दास असे ...!!
************************
प्रा.सौ.संगिता भालसिंग
3/3/15
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.