गुरुवार, ३१ मार्च, २०१६

रातराणी बहरुन आली

विशेष चारोळी स्पर्धेत माझ्या 20 रचनांना
सुवर्ण पदकाचा गौरव प्राप्त .
शब्दरंजन ग्रुप - विशेष अणि झटपट ****
चारोळी स्पर्धा
***********************
1
रवि गेला अन् शशी आला
ग्रह तारे तारका चमकली
प्रेमिकांची रात ही गंधाळली
अणि रातराणी बहरुन आली
*************************
2
शिशिर गेला अन् वसंत फुलला
सणा वारांची दाटी वाटी होवून
सोळा पत्रावळी उपलब्ध झाली
अणि रात राणी बहरुन आली
*************************
3
गुपित संकेत मिलनाचा
चांदणी रात्र ती खुललेली
हात हाती अन् अंगी शहारा
अणि रात राणी बहरुन आली
*************************
4
सावळा रामचंद्र रत्नमंचकी
सीतेच्या गाली चढली लाली
गवाक्षातून डोकवी तो शशी
अणि रात राणी बहरून आली
*************************
5
रामचंद्राच्या हाती पुष्प माला
सीतामाई लाजुन गोड हसली
देवगण पुष्पवर्षाव करू लागली
आणि रात राणी बहरुन आली
**************************
6
सुंदर सुगंधी पारिजात फुले
सत्यभामेच्या अंगणी फुलली
कृष्ण सत्यभामेच्या महाली
अणि रात राणी बहरुन आली
**************************
7
रात किड्यांची किरकिर अन्
रात्र गूढ़ अंधारात न्हाली
धुंद फुंद गंध श्वासात भरला
अणि रातराणी बहरून आली
*************************
8
अजुन यौवनात असे ती
वयाची खूण दिसे गाली
जीवन सुखाचा रस प्याली
अणि रात राणी बहरून आली
**************************
9
घडीभराचा विरह तो काय
भावनाच्या सागरात डुंबली
मिलनाच्या झुल्यात झुलली
अणि रात राणी बहरुन आली
************************
10
प्रिय साजन दूरदेशी गेला
सांगावा आला खुशाली
मनमोर थुईथुई नाचू लागला
अणि रात राणी बहरून आली
**************************
11
चंद्र भुलला चांदणीला
चूर होवून निशा लाजली
काजवाही प्रकाशु लागला
अणि रात राणी बहरून आली
**************************
12
रामसीतेच्या कुटित चंद्रकिरण
पाहुनी सीतेच्या गाली लाली
अमर प्रेमाला साक्षी ती सृष्टी
अणि रात राणी बहरून आली
*************************
13
चंद्रासम तू सुंदर चांदणी
बाप म्हणे लाडक्या लेकीला ...
सौंदर्य पाहून चंद्रही भुलला
अणि रात राणी बहरुन आली
************************
14
चंद्र चांदणीचे अमर प्रेम
पाहून सागर कसा खवळला ?
भरती ओहोटी खेळ रंगला
अणि रात राणी बहरून आली
**************************
15
कातरवेळ भरुन आली
सजनाची याद दाटून आली
मिलनाचा संकेत मिळाला
अणि रात राणी बहरून आली
************************
16
पावसाळी धुंद मृदगंधाला
चराचर सृष्टी आतुरलेली
जलद भरुनी जलद आले
अणि रात राणी बहरून आली
*************************
17
अचानक नयनभेट घडली
अन् जखम सुगंधी जाहली
प्रेमस्पर्श झाला तो पहिला
अणि रात राणी बहरून आली
**************************
18
गंधाळलेल्या अलवार शब्दांची
कविताही अशी मोहरुन आली
साहित्य कुंज मनोहर सजला
अणि रात राणी बहरुन आली
**************************
19
जसा मोगर्याचा सर्पवेढा,तशी
घट्ट मिठी मला तू मारिली ...
बघ मोगरा किती गंधाळलाय
अणि रात राणी बहरून आली
************************
20
केंव्हा तरी पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली
चढत्या रातीला प्रेम बहरले
अणि रात राणी बहरून आली
**************************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

30 मार्च 2015

बुधवार, ३० मार्च, २०१६

वय

वय
**************

वय झाले आता
हाती आली काठी
गत जीवनाची
कथा किती मोठी ....

****************
सौ.संगिता भालसिंग
३० मार्च २०१६
spsfun.com
Good morning friends

मंगळवार, २९ मार्च, २०१६

आठवण

तुझी आठवण येते
तू येत नाही ...
कधी तू येते....पण
आठवण जात नाही ...!!
****************
सौ.संगिता भालसिंग
२९ मार्च २०१६

इवलीशी चारोळी

🌻 इवलीशी चारोळी 🌻

ईवल्याश्या चारोळीची
किमयाच लई लई भारी ...
चार ओळींची अदाच न्यारी
फ़िदा असे सानथोर सारी ...!!

ईवल्याश्या चारोळीतून
जीवन दर्शन घडते ...
गुढ अर्थाची उंच लाट
खोल काळजाला भिडते ...!!

ईवलीशी चारोळी जशी
जणू सदऱ्याची गुंडी ....
शब्दात विणताना तिला
वाजे भल्याभल्याना थंडी ...!!

चारोळी म्हणजे जणू मॅगी ,
बुद्धि सदा जागी ठेवते ....!!
कमी शब्दात गहन अर्थ ,
मांडण्याची जागा दावते ....!!

चारोळीची रचना करणे
येरागबाळ्याचे काम नव्हे ...
महाकाव्याचा अर्थभाव
तिच्यात दडलेला आहे ...!!

************************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
२८ मार्च २०१६
spsfun.com
******************

सोमवार, २८ मार्च, २०१६

राम माझा पाठीराखा

श्री रामनवमी निमित्त स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त
यात मी खालील रचना केल्या होत्या .(27चारोळ्या)
**************************
रावणाने केले सीताहरण
बंदिस्त अशोक वाटिका
दर्भ ठेविलें संरक्षणा
राम माझा पाठीराखा ..
**************************
रामजपाचा महिमा अपार
वाल्मीकि होई ऋषिसारखा ..
रामायण लेखनाचे भाग्य
राम माझा पाठी राखा ..
**************************
आन बान शान
रामासारखी राखा ..
आशीष घेऊन म्हणा
राम माझा पाठीराखा ...
***************************

चराचरात वसे श्रीराम
रामनाम असो सदा मुखा
शेवटचा श्वास बोलेल
राम माझा पाठीराखा ...
***********************
सीता ओलांडी रेखा
फसुन रावणाच्या नाटका
लक्ष्मण करी पाठलाग म्हणे
राम माझा पाठी राखा
************************
राम चाले वाटे
लक्ष्मण उचली कंटका
असा बंधू नाही कोठे
राम माझा पाठी राखा
**************************
सीता भुलली मृगाला
दिसे सुवर्णा सारखा
लक्षमण धावताना म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
रामायण लिहिले आधी
घडले नंतर बरका ...
वाल्मीकि सदा म्हणे
राम माझा पाठीराखा ...
************************
अटळ अग्निपरीक्षा
उरी धडधड लोका ...
अग्नित शिरली सीता म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
जातीभेदाच्या दंगली
पोलिस मारीती दंडूका ..
पळता प्राणभयाने म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
सीतेच्या तोलाचा नाही
राम दिलाचा हलका ..
गर्भार सीता म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
लेक आली लग्नाला
नाही पैसा अड़का
कशाला करू चिंता ?
राम माझा पाठीराखा ...
***************************
शेतकरी बाप माझा
पड़े दुष्काळ सारखा ..
दुर्दम्य इच्छाशक्तीन म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
राम सीता वनवासी
भरत रक्षी राम पादुका ...
राज भोग न घेता म्हणे
राम माझा पाठी राखा
**************************

वचन घेऊन कैकयीन
दशरथाला दिला धोका ...
शेवटच्या श्वासाला म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
वाल्या कोळयाला दिला
बायको पोरांनी धोका ..
मरा मरा म्हंणताना म्हणे
राम माझा पाठीराखा ..
***************************
शेतकरी आई बाप
गेले करुन पोरका ...
पण करील स्वप्न साकार
राम माझा पाठीराखा ...
***************************
बाप म्हणे लेकींना
लाडक्या खारका ..
ऋणात शिक्षण देईन
राम माझा पाठीराखा
**************************
सीता वनवासी दगडाची उशी
संवाद करी वृक्ष अन् लतिका ..
लवकुश बाळ वाढवी कशी ? म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
रामकुंडावर बिछाई
हाती सुवर्ण मुद्रिका
पाय चेपी सीतामाई, म्हणे
राम माझा पाठीराखा
***************************
वनात वाट पाहे शबरी
साथ असे वृक्ष लतिका ...
ऊष्टी बोरे रामास देई म्हणे
राम माझा पाठी राखा ..
**************************
अखंड राम नाम जपताना
वाल्या भोवती वारुळ मृत्तिका ...
रामायण लिहिताना म्हणे
राम माझा पाठीराखा ....
**************************
काळवंडला अंजनीसुत
शेपटीनं जाळली लंका ...
रावणा निरुत्तर करी म्हणे
राम माझा पाठीराखा ...
***************************
झेप घेई महाबली
घेऊन राम मुद्रिका ..
म्हणे समुद्र करीन पार
राम माझा पाठीराखा ...
***************************
संसारतापे पोळले मी
घेतेय सुख दुखा चा झोका ...
भवसागर जाईल तरून
राम माझा पाठीराखा...
***************************
रावणाचा सहोदर तो
होई श्रीरामाचा सखा ..
लंकाभेदी बिभीषण म्हणे
राम माझा पाठीराखा ..
**************************
दळिता कांडिता
बहिणाई सांगे लोका ...
लपे करमची रेखा
राम माझा पाठीराखा ...
**************************
सौ.संगिता भालसिंग
28/3/15
श्री राम नवमीच्या शुभेच्छा

रविवार, २७ मार्च, २०१६

स्वप्नांचा गांव

पावसाच्या पाण्यात
सोडु या रे नाव ...
पैल तिरी वसलाय
स्वप्नांचा सुंदर गांव ...
****************
सौ.संगिता भालसिंग

स्वप्न

स्वप्न

कातर वेळी पडलेले सुंदर स्वप्न
पावसाच्या सरीत चिंब भिजणं ...

नदीकिनारी हात गुंफुण गुज गोष्टी
पौर्णिमेच्या राती पाहु शितल चांदण ..

रातराणीचा गंध श्वासात भरुन घेणं
कुशीत रडुंन प्रेमपुरात वाहनं ...

अशी सुंदर कल्पना साकार करणं
करू प्रार्थना देवा सुंदर कर जगणं ...

***************************
सौ.संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...