गुरुवार, ७ एप्रिल, २०१६

सार

सार

जाती धर्माला वादाची
कडवट किनार आहे ...
उच्च मानवता मूल्य
सर्व धर्माचे सार आहे ...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
०७ एप्रिल २०१५
spsfun.com
************
सुप्रभात

रविवार, ३ एप्रिल, २०१६

बोलकी बाहुली

🌻 बोलकी बाहुली 🌻

बोलकी बाहुली
नाव तिचे राणी
गाते सदा गाणी
गुणगुण ...

नाचरी बाहुली
तालसूर छान
हलविते मान
डुगडुग ...

हसरी बाहुली
खळी गालावर
हसु ओठावर
खुदुखुदु ...

उंचसे सैंडल
नाजुकशी चाल
टोपी गोल गोल
लालेलाल ...

कुरळे कुरळे
केस काळे काळे
घारे घारे डोळे
काळे काळे

सुंदरसा फ्रॉक
रंगीत झालर
उबदार स्वेटर
मऊमऊ ...

*******************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
०३ एप्रिल २०१६
spsfun.com
Copyright

काळीज

प्रथम क्रमांक प्राप्त रचना

चारोळी स्पर्धा क्रमांक ११
***********************

सख्याचे अलवार अतूट प्रेम ,

लेखणीतून अलगद झरावे ...!!

पावसात रिमझिम सरीसम ,

कागदावर काळीज उतरावे ...!!

************************

प्रा. सौ.संगिता भालसिंग
२८ मार्च २०१६
अहमदनगर
spsfun.com

गाठोडे

🌷 गाठोडे 🌷

एकदा काही दुःखी लोक
जाऊन भेटले देवाला
'न्याय करा' विनविले
देऊन भक्तीचा हवाला ...!!

देवा,अशी विषमता
तू का म्हणून केली ?
माझ्यापेक्षा दुसऱ्याला
दुःखं कमी का दिली ?....!!

देव उत्तरला, या समोर ठेवून
सुख दुःखाची गाठोडी बांधून
अणि धावत पळत जावून
दुसऱ्याचे गाठोडे घ्या उचलून ...!!

उत्सुकतेने प्रत्येकाने दुसऱ्याचे
गाठोडे पाहिले उघडून,अणि
बसले डोक्याला हात लावून
खूप मोठी मोठी दुःखं पाहून ...!!

सर्वानी विचार केला मनी
देवाला सांगितला पटकनी
माझेच गाठोडे बरे होते
निदान,त्यात दुःख तरी कमी होते ...!!

**************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
०७ मार्च २०१६
Spsfun. com
Copyright
🌹🌹🌹🌹
Good morning

शुक्रवार, १ एप्रिल, २०१६

कान्हा

कान्हा

यशोदे तुझा कान्हा
किती करतो खोड्या
तरी साऱ्या गवळणी
कान्हाच्याच प्रेम वेड्या..

प्रा. सौ.संगिता भालसिंग
०१ एप्रिल २०१६
spsfun.com

एप्रिल फुल

एप्रिल फुल -चारोळी स्पर्धेत द्वितीय क्रमांक
************************************
मुर्ख शिरोमणी शोधण्या
रचिती सुंदर गुपित डाव ....
एप्रिल फूल ते हासविण्या
खाऊन जाती किती भाव ....?
*************************************
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
31/3/15

वसंत ऋतु

संवाद देशभक्त वर्तमान पत्रात प्रकाशित
दि.०१ एप्रिल २०१६

🌹 वसंत ऋतू 🌹

शिशिर गेला , वसंत आला
ऋतुराज म्हणतात त्याला ...

पहा आम्रतरु बहरला
धुंदगंध आंबे मोहराला ...

कंठ फुटे गान कोकिळेला
ताल कर्णमधुर गाण्याला ...

नवती आली, पानापानाला
सुंदरता हिरव्या रंगाला ...

किलबिल पक्षी सावलीला
नवरूप आले धरतीला ...

आनंदाचे उधाण मनाला
चला,नववर्ष स्वागताला ...

तोरण बांधू घरादाराला
रंगीत नववस्त्र गुढीला ...

देऊ आमंत्रण होलिकेला
दुष्ट परंपरा जाळायला ...

जुन्या नव्याची सांगड घाला
चला,वसंतात रंगायला ...

**************************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
११/०२/१६

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...