भावना
मावळता सूर्य ,
गंधाळल्या भावना ...
गतस्मृती निखर्व ,
भेगाळल्या यातना ...
सौ.संगिता भालसिंग
अहमगनगर
spsfun.com
Good evning friends...!!
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
भावना
मावळता सूर्य ,
गंधाळल्या भावना ...
गतस्मृती निखर्व ,
भेगाळल्या यातना ...
सौ.संगिता भालसिंग
अहमगनगर
spsfun.com
Good evning friends...!!
आभार
सखे,मन भुलले
पाहुनी तुझा शृंगार ...
पाहिले वळून मला
सखे तुझे आभार ...
"""""""""":"""""""""""
सौ.संगिता भालसिंग
नातं तुझं माझं
ईवल्याशा कळीचं
जसं फुल फुलत जाते
तसं फुलत गेलं
नातं तुझं माझं ...
भावनेच्या हिंदोळ्यावर
प्रेमाचा झुला झुलतो
तसं झुलतं गेलय
नातं तुझं माझं ...
हातावर हिरव्या मेंदीचा
लाल रंग जसा खुलतो
तसं खुलत गेल
नातं तुझं माझं ...
वेलीवर मस्त झुलणारी
सुगंधी फुलं जशी डोलतात
तसं डोलत गेल
नातं तुझं माझं ...
*************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
4/3/16
Spsfun. com
आज मंगळवार दि.३१ में २०१६ रोजी
एकमत वर्तमान पत्रातील "साक्षी"
पुरवणी मधे प्रकाशित रचना ...!
" भेट "
प्रा.सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
spsfun.com
तृतीय क्रमांक प्राप्त रचना
🌻 बाळ कृष्ण 🌻
*****************
नंद दरबारी
आरसे बिलोरी
रांगताना पाही
नटखट हरी ...
नंदाच्या कान्हाला
टोचला ग खड़ा
यशोदेचा जीव
झाला थोडा थोडा ...
सावळा गोंडस
खोडील मुरारी
कवळाया धावे
दरबारी सारी ...
शिरी मोरपिस
वार्यावर डोले
हातीपायी वाळा
छुन छुन बोले ...
रांगत बसत
मागे पुढे पाही
हसत रडत
वाकुल्याही दावी ...
भरवित घास
यशोदा माऊली
नको म्हणूणीया
मुंडी हलविली ...
दमला भागला
पेंगाया लागला
कुशीत घेतला
अंगाई गायला ...
मिटल्या पापण्या
संपली अंगाई
गालात हसत
कान्हा झोपी जाई ...
***sps.fun ***********
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
हार
विरहाच्या अग्नित
जे वार झाले
भेटीच्या मिठीत
ते हार झाले ...
सौ.भालसिंग संगिता
अहमदनगर
spsfun.com
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...