मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०१६

माझी गजल १०

माझी गजल १०

रात

भ्रष्ट पैसे खात आहे
चारित्र्यावर मात आहे

ढोंग धारी मानवाची
द्वाड भारी जात आहे

दान देता आखडीतो
खाष्ट त्याचा हात आहे

मान देता ऊंच होतो
हाच त्याचा घात आहे

ओरबाडी बालकांना
षंढ त्याची रात आहे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
Copyright

माझी गजल ०९

माझी गजल ०९

दान देण्या जात आहे
वैभवाचा हात आहे

जीवनाची रीत आहे
मानवाच्या आत आहे

अंतरंगी पेटलेली
जीवनाची वात आहे

वेदनेने पोळलेल्या
जखमेवर मात आहे

प्रेम देत्या काळजाचा
हा नवा प्रघात आहे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

Copyright
Spsfun.com

माझी गजल ०८

माझी गजल ०८

बोल माझे ठाम आहे
काव्य माझे धाम आहे

भावनांचा हा पसारा
वेचण्याचे काम आहे

अक्षरांशी खेळतांना
गाळलेला घाम आहे

बासरीचा नादसारा
सूर माझा शाम आहे

लेखणीने कोरलेला
वेळ माझा राम आहे

सौ.संगिता भालसिंग
spsfun.com
Copyright

माझी गजल ०७

माझी गजल ०७

नेणत्याला ज्ञान नाही
वंचिताला भान नाही

जातिभेदी दावणीला
संपदेचे दान नाही

सूर गेल्या गायकाला
राजगृही गान नाही

ज्ञानदायीं शारदेला
गांवगुंडी मान नाही

देहभोगी मानवाला
प्राण जाता शान नाही

सौ.संगिता भालसिंग

माझी गजल ०६

माझी गजल ०६

राम गावा
नाम धावा

राम नामे
जीव जावा

गुंतलेला
श्वास व्हावा

तूच माझा
खास व्हावा

मीच  माझा
दास व्हावा

सौ.संगिता भालसिंग

प्रकाशित गजल

आज दि.१८/१०/१६ रोजी
एकमत वर्तमानपत्रात साक्षी
पुरवणी मधे माझी गजल
प्रकाशित....

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

माझी गजल ०५

माझी गजल ०५

दुःख

काळजाशी खेळतांना
वेदनेने पोळतांना ...
ही अशी खंबीर झाले
भावनेला जाळतांना ...

या जगाशी भांडतांना
आळ खोटे टाळतांना
मी अशी गंभीर आहे
वाद मोठे गाळतांना

त्या सुखाला शोधतांना
गंध पुष्पे माळतांना
मी अशी तैयार झाले
सोनपंखी भाळतांना

अंत आला मांडतांना
या जिवाला घोळतांना
द्वाड बोली कांडतांना
लाल झाली साळतांना

याद आली चालतांना
गूढ पाने चाळतांना
धाप लागे धावतांना
दुःख सारे  पाळतांना

प्रा. सौ.भालसिंग संगिता

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...