गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गझल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

गझल - गुलाबी

गझल 


वृत्त आनंदकंद
लगावली..गागाल गालगागा गागाल गालगागा
*****
Marathi मराठी साहित्य प्रकार मराठी गजल गुलाबी


गुलाबी 

केसात घातलेली होती फुले गुलाबी
कानात घातलेली होती डुले गुलाबी

पदरास लावलेले रेशीम पैठणीला
गोंडयास लावलेले मोती झुले गुलाबी

वाळूत उमटलेल्या होत्या खुणा शराबी
वेगात चाललेली ती पाउले गुलाबी

जाळ्यात अडकलेला भुंगा नसे विषारी
आरास पाकळ्याची गाली खुले गुलाबी

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

गडबड - गझल

गडबड - गझल 


पादाकुलक मात्रा वृत्त
8,8

गागागागा गागागागा

 सत्य बोलता गडबड झाली
रीत जगाची अवघड झाली...

उंच मनोरे बांधू कोठे
पायाचीही पडझड झाली...

भेटी गाठी  वादा वादी
काळजातली धडधड झाली...

नको विसंबू वचनावरती
विश्वासाची रडरड झाली...

वाट वाकडी वळणावरची
पंखाचीही फडफड झाली...

दोष लपाया,होश टिकाया
किती निरर्थक बडबड झाली...

संगिता भालसिंग
अहमदनगर
शनिवार 21 सप्टेंबर 2019

आशा - गझल

आशा - गझल 


जलौघवेगा वृत्त
लगालगागा लगालगागा
आशा - गझल , साहित्य प्रकार, कविता



मनात आशा जिवंत नाही
तरी जिवाला खंत नाही

कशास मागे वळून पाहू
तुलाच आता उसंत नाही

उगाच वचनास जागताना
गुलाम होणे पसंत नाही

तुझीच मीरा तुझीच राधा
अशा भक्तीलाच अंत नाही

जहर पिताना खुशीत होती
उगाच किर्ती दिगंत नाही

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
रविवार 22.09.2019

गझल - बाजार

गझल - बाजार 


भावनेचा मांडला बाजार आहे
सांग आता तू खरा का यार आहे ...

दाविशी स्वार्थात लोकांना उणीवा
या मनाला त्रास याचा फार आहे...

वेदनांचे केवढे आघात सारे
कोवळ्याशा काळजावर वार आहे ...

रोज होतो हा तमाशा लावणीचा
नाचताना अंतरात्मा ठार आहे ...

उमगली सारी टवाळी या जगाची
साथ खोटी प्रेम ही व्यापार आहे ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१९

व्यापार - गझल

व्यापार - गझल 


भावनेचा मांडला बाजार आहे
सांग आता तू खरा का यार आहे ...

दाविशी स्वार्थात लोकांना उणीवा
या मनाला त्रास याचा फार आहे...

वेदनांचे केवढे आघात सारे
कोवळ्याशा काळजावर वार आहे ...

रोज होतो हा तमाशा लावणीचा
नाचताना अंतरात्मा ठार आहे ...

उमगली सारी टवाळी या जगाची
साथ खोटी प्रेम ही व्यापार आहे ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

मैत्री - गझल

गजल - मैत्री 




ओढ आहे वेगळी ही छान मैत्री
अमर नाते जीवनी ही शान मैत्री

त्या भितीचा स्पर्श नाही थोडकाही
संकटाला थोपवाया दान मैत्री

सूर्य आहे सोबतीला मार्ग दावी
वाकडी ना वाट डावी भान मैत्री

ओल आहे साठलेली या मनाशी
काळजाचे हे सुगीचे  रान मैत्री

बंध आहे रेशमाचे मलमली हे
भावनांनी मांडलेले ठाण मैत्री

प्रेम भरलेल्या सुरांनो साथ द्या रे
संगिताने गायलेले गान मैत्री

सौ.संगिता भालसिंग



सोमवार, १५ जुलै, २०१९

मागणे - प्रकाशित गझल

माझी प्रकाशित गझल
आज सोमवार दिनांक 15 जुलै 2019 रोजी "परळी समाचार"मध्ये माझी कविता प्रकाशित....
सौ.संगिता भालसिंग

शनिवार, १३ जुलै, २०१९

डाव - गझल

डाव - गझल 



मांडलेला डाव होता
मोडण्याचा डाव होता ..

जो कधी काळी उराशी
बांधलेला गाव होता ..

उधळलेल्या सोंगटयांचा
केवढा रे भाव होता..

तू रडीने खेळलेला
काळजावर घाव होता..

तो कटोरा रे दयेचा
आणलेला आव होता..

 Sangita B Bhalsing

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

भूक - गझल

भूक

मौन - गझल

माझी गजल


वॄत्त -  मनोरमा

गालगागा गालगागा

मौन

मौन आहे आज आता
जाहले नाराज आता...

हा अबोला का धरावा
शोधतो का काज आता...

सावलीशी का दुरावा
भावतो का साज आता...

देत होता का पुरावा
अमर प्रेमी नाज आता...

वेदनेने का झुरावा
या मनाचा ताज आता...

आठवांनी का करावे
या दिलावर राज आता...

का पुन्हा मागे फिरावे
सोडली रे लाज आता...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


राम नाही

आज मंगळवार दि.०७/१२/१६
एकमत वर्तमान पत्रात माझी गजल
प्रकाशित ....!!

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

अभंग नाते

माझी गजल ४४

वॄत्त अनलज्वाला
मात्रा २४
८+८+८

अभंग नाते

प्रेमाचे हे अभंग नाते जोडू आता
परंपरेच्या घट्ट शृंखला तोडू आता...

आनंदाची स्वप्नवाट ही शोधण्या नवी
गंजल्या अशा भक्कम रूढी मोडू आता...

जीवन दाहक नकोनकोसे घेऊ हाती
आज पाण्यात तिलांजली ही सोडू आता...

 क्षितिजावरती दिसणाऱ्या त्या काळ्या काळ्या
अंधाराच्या कातळालाच फोडू आता...

आज वेगळ्या वाटेवरती चल जोडीने
जातीधर्मात कोरले नाव खोडू आता...

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

संचित

माझी गजल

वॄत्त - अनलज्वाला
8+8+8

संचित

पहा घातली त्यास फुलांची माला आता
जाता जाता भार जीवास झाला आता...

जिथून आला तिथेच गेला चिरंजीव तो
नका रडू रे आसू पुसून चाला आता...

गेल्या मागे कोणी जातच नाही मनुजा
भूकेपोटी तो कडू घास घाला आता...

नको पाहूस मागे उरले भोगायाचे
पहा लागला आत्म्यास असा ताला आता...

कर चांगलाच पुण्य साठा संचित काही
पुन्हा गर्भात जन्माचा काळ आला आता...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

हार

माझी गजल ४६
वॄत्त अनलज्वाला
8+8+8

हार

सन्मानाचा आज कोणता हार पाहिजे
कर्त्तव्याला सत्कार्याची धार पाहिजे...

आज कोणते खारे आसू मोजतोस तू
पापण्यांत आता नजरेचा भार पाहिजे...

हृदय कोंदणी धडधडणाऱ्या शिंपल्यातले
मोत्यासाठी सारे खारे क्षार पाहिजे...

कोरे कोरे नाजूक भाव किती तराशतो तू
काळजावरी हिरकणीचाच वार पाहिजे...

नको विसावा आता थोड़ा ओढाळ मना
भावनेला हा बांधलेलाच पार पाहिजे...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

सुंदरी



वॄत्त सूरमंदिर
मात्रा 10
गालगा गालगा

 सुंदरी

गोबरे गाल ते
जाहले लाल ते...

लाजली कोमला
बावरी चालते...

सावरी हात ते
रेशमी बाल ते...

सुंदरी पाहुनी
केवढे हाल ते...

हात हाती असा
लाभले साल ते..

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
18/12/16

मिळत नाही



वॄत्त मुरजयी
मात्रा 15
8+7

   मिळत नाही

काय हवे ते कळत नाही
हवे तेंव्हाच मिळत नाही...

बाळ उपाशी आईला तो
आजही घास गिळत नाही...

जे जे होते , पहात रहा
अटळ काळ हा टळत नाही...

तनामनाने गांजलेला
निराश थांबे,पळत नाही...

हटवादी त्या मानवाला
सांगितलेले वळत नाही...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
18/12/16

सूर मंदिर



वॄत्त सूरमंदिर

मात्रा १०
गालगा गालगा

गुन्हा

लाभले दान हे
वाटले छान हे...

लाजाले नयन हे
हरवले भान हे...

कोरले जीवनी
चंदनी पान हे...

या जगाने किती
उठविले रान हे...

हा गुन्हा ना पुन्हा
पकडले कान हे...


सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
18/12/16

आक्रमण



वॄत्त जीवनलहरी
मात्रा १२ ( ६+६ )

आक्रमण

सुखात ते गाव असे
सुंदरसे नाव असे...

सर्वांच्या मनामधे
प्रेमाचा भाव असे...

आनंदी जीवनात
प्रत्येकजण राव असे...

एकी तोडणे ,काही
दुष्टांचा डाव असे...

संस्कृती आक्रमण
आता हा घाव असे...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
18/12/16

क्रांती

माझी गझल ५१

वॄत्त मूरजयी
मात्रा १५ (८+७)



 क्रांती

ओला झाला खडक आता
मार चांगली धडक आता...

मशाल हाती नाविन्याची
बांधायाला सडक आता...

घाव घालून तोड जूने
अशी मुसंडी तडक आता...

माघार नको चालत रहा
क्रांती झेंडा फडक आता...

पवित्र भावना मानवतेच्या
प्रेम जाळयात अडक आता...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
18/12/16

साल



वृत्त - मनोरमा

गालगागा गालगागा

साल

काळजाची साल केली
आयुष्याला शाल केली...

भावनेला थाप देता
चारित्र्याची ढाल केली...

जिंकण्याची हौस भारी
ती गनीमी चाल केली...

धुंदलेल्या या मनाला
कुंपणाची ताल केली...

जिंदगी कुर्बान सारी
तू किती बेहाल केली ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
13/01/17

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...