गुरुवार, ४ मे, २०१७

लेणे

स्वतः जळते
प्रकाश देते
कुणा न कळते
चटकलेणे लेते ...

Sangita Bhalsing

माझी गझल-भुईभार

माझी गझल

भुई भार

किती पाप सारे,भुई भार झाले
नसे चाड कोणास,लाचार झाले

मनाच्या तळाशी कलीचे युग हे
नितीचे उखाणे तडीपार झाले

भुकेल्या जिवाला बहाणे तुपाचे
असे भाव खोटेच व्यापार झाले

इथे कोण नाही कुणाचे कधीही
लगातार पाठीवरी वार झाले

मरे रोज त्याला कुणी का रडावे
नक्राश्रू असे कोरडे क्षार झाले

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
Copyright

शुभ रात्र

माझी गझल-वरदान

माझी गझल
वृत्त-मनोरमा
गालगागा गालगागा

🌷 वरदान 🌷

तू दिलेले दान आहे
हे किती रे छान आहे

रेशमी ओटीत माझ्या
खेळणारे प्राण आहे

बोबडेसे बोल बोले
ही गुणाची खाण आहे

लाजवी चंद्रास भारी
रंग गोरा पान आहे

लेकराच्या कौतुकाचा
या जिवाला मान आहे

ही सुखाची वेल वाढे
दोन दारी शान आहे

लपविते पदरात आता
लाभले वरदान आहे

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
28/01/17

माझी गझल-मंथन

मंथन

प्रकाशित गझल-पालखी

आज मंगळवार दि.१४ मार्च २०१७
एकमत वर्तमान पत्रातील पुरवणी
      🌻 साक्षी 🌻
मधे माझी कविता प्रकाशित.

सौ.संगिता भालसिंग
Sangita Bhalsing
अहमदनगर

माझी गझल-भारतीय

कामिनी
गालगाल गालगाल गा
💐 भारतीय 💐

रंग वंश हा दबाव रे
तो नकोच भेदभाव रेे

प्रेमगीत गात राहते
ते सुखी खुशाल गाव रे

भिंत पाडली अमानवी
गाजले जगात नाव रे

साथ दे समानतेस रे
द्वैत भावना मज्जाव रे

जात पात तोडफोड़ रे
भारतीय ठेव नाव रे

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
15/03/17

माझी गझल-दुष्काळ

माझी गजल

💐💐💐💐💐

🌹दुष्काळ🌹
💐💐💐💐💐💐

पाण्यासाठी वणवण आहे
भांडीकुंडी ठणठण आहे ...

पैसा नाही अडका नाही
खाण्याचीही चणचण आहे ...

सर्दी झाली कफही झाला
अंगी थोडी कणकण आहे ...

जगण्याचाही लोच्या झाला
डोक्यालाही गणगण आहे ...

दुष्काळाने नाते जाळी
आगीची ही ढणढण आहे ...

सैरावैरा धावे आता
पायाचीही दणदण आहे ...

काढू कर्जे फेडू हप्ते
फाशी आता क्षणक्षण आहे ...

Sangita Bhalsing

Ahamadanagar

Copyright

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...