रविवार, ६ जानेवारी, २०१९

नाती

नाती

सावरूनी नाती जरा घ्या
पांगताना सावली
नाळ अशी तोडू नका हो
काळजाच्या आतली !!०१!!

जाग हवी राती जराशी
वादळाची सावली
काळ असा अवचित येतो
मांजराच्या पावली!!०२!!

आग जरा विझवून घ्यावी
मानवी देहातली
वाद जरा मिटवून घ्यावी
भावना प्रेमातली!!०३!!

देव कुठे भेटेल आता
वेदनेची काहिली
टाळकुट्या समजून घे रे
साधना नामातली!!०४!!
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

लगाम

यवतमाळ.... मराठी साहित्य संमेलन...
गझल
वॄत्त  आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा

"लगाम"

कंठात नाम नाही,नावात राम आहे
भोगात दास त्याचे , जगणे हराम आहे...!!०१!!

बोलू नकोस खोटे ,सांभाळ शब्द आता
पाळाच मौन थोडे, जिव्हा लगाम आहे...!!०२!!

खेळू नकोस आता,हूकम तुझ्या मनाचा
खाशील मात आता, राणी बदाम आहे...!!०३!!

आणू नकोस मोठा,श्रीमंत आव आता
ध्यानात ठेव सारे,जीवन छदाम आहे...!!०४!!

कामात ध्यान ठेवी,घामात काम ठेवी
मोक्षास शोधतो तू,येथेच शाम आहे...!!०५!!

विश्वात देव आहे,विश्वास ठेव आहे
बांधून चार भिंती,सौख्यात धाम आहे...!!०६!!

भूकेस घास घाला,भीकेस भीक घाला
संपेल ना कधी हे,भारी इनाम आहे...!!०७!!

घेऊन टाक काही,देऊन टाक काही
मानापमान सोडा,नात्यात दाम आहे...!!०८!!

गजलेत मांडलेले,हे शेर संगिताने
गाथेत ठेव आता,सारे कलाम आहे....!!०९!!

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

सार

वृत्त-आनंदकंद

   सार 

रागास त्याग वेडया,प्रेमात सार आहे
देऊ किती पुरावा ,जीवन बहार आहे !!०१!!

घेऊन टाक काही,देऊन टाक काही
मानापमान सोडा ,व्यापार हार आहे !!०२!!

बोलू नकोस कडवट,सांभाळ शब्द आता
घाला लगाम थोडा,जिव्हेस धार आहे !!०३!!

भिंतीस कान आहे,सांगू नको कुणाला
विश्वास घात होता,पाठीत वार आहे !!०४!!

ओढून खात राही,चोरून पीत राही
संस्कार आज नाही,मानव सुमार आहे !!०५!!

देहात रोग आहे,भोगात नाश आहे,
त्यागून दोष टाका ,नौकाच पार आहे !!०६!!

वाटेत कुंकवाची,उधळण लाल झाली
सौभाग्य पालखीला,ऐटीत नार आहे !!०७!!

हा जन्म मानवाचा पुन्हा मिळेल का रे
स्वार्थात राहसी तू , पृथ्वीस भार आहे !!०८!!

गजलेत मांडलेले,हे शेर संगिताने
समजून घ्या जरासे ,इच्छाच फार आहे !!०९!!

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
गुरुवार दि.१३.१२.१८

बळी

क्रांतीची फुले समूह

वृत्त-आनंदकंद
गागालगा लगागा गागालगा लगागा

गर्भार रान होते,ओढून नांगराला
मातीत धान येते,पेरून काळजाला...

डोळ्यात आसवांचा,अंगार पेटलेला
चातक बनून देतो,ही साद पावसाला...

फाशी नसो बळीला,धमनीत कष्ट खेळे
येवो किती दुखाळे, फोडीन कातळाला...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर रविवार दिनांक 06.01.19

स्पर्धेत समाविष्ट रचना

फुले

इवल्या सुगंधी फुलांचे
आयुष्य किती महान...
सुगंध उधळून देती
जरी असे जीव लहान...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

शुक्रवार, २८ डिसेंबर, २०१८

सप्तपदी

चारोळी

सप्तपदी

सप्तपदी चालू
हात हाती घेऊन..
संसार रथ ओढू
वचने याद ठेऊन ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

भारत माझा देश आहे

कविता
भारत माझा देश आहे

भारत माझा देश आहे
तिरंगी झेंड्याचा
अशोक चक्राचा
स्वातंत्र्य,समता
आणि बंधुतेचा
मानवी मूल्याचा वेष आहे
भारत माझा देश आहे!!०१!!

गंगा यमुना
सरस्वतीचा
विंध्य सह्याद्री
हिमालयाचा
पहाडी छातीचा कोष आहे
भारत माझा देश आहे !!०२!!

हिंदू मुस्लिम
शीख ईसाई
विविधतेत एकता
राष्ट्रीय एकात्मता
एक मुठीचा जोश आहे
भारत माझा देश आहे!!०३!!

संस्कृतीचा पाईक
संस्काराची खाण
सीमेवर लढती
भारतीय जवान
रक्त सांडून परिपोष आहे
भारत माझा देश आहे!!०४!!

तरुण लोकसंख्येचा
ज्ञानसंग्रही ज्येष्ठांचा
सत्य अहिंसेचा अन
सुजलाम सुफलाम सृष्टीचा
विज्ञान भरारीने जगही बेहोष आहे
भारत माझा देश आहे!!०५!!

आहेत किती अन
होतील किती
हिंदुस्तान देशा
ना अंत ना मिती
प्रतिकारातही होश आहे
भारत माझा देश आहे!!०६!!

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...