तारे विझून गेले
गुलाब सुकून गेले...
आठवांचे शेले आता
अश्रूंनी भिजून गेले...
Sangita Bhalsing
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
डोळ्याने बोलत रहा
पापणी तुझी मूक नको....
ओठाने बोलायची
पुन्हा पुन्हा चूक नको...
Sangita Bhalsing
मी भिकारी रे जरीही देव आहे देश माझा ...
वंदनाला आहे जरी फाटलेला वेष माझा ...
भारतीचा लाडका मी पुत्र आहे वेगळाला ...
या मनाला सांगतो मी दाबताना रोष माझा ...
प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
स्पर्धेत सहभागी रचना
महाराष्ट्र साहित्य मंच
कविता
तुटलेली पतंग
कटली रे कटली
पतंग कटली...
मुलांची धावपळ
धूळ माती उठली...
ढील दे दे,ढील दे दे
आरोळी उठली...
पतंगाची काटाकाटी
जीवाची शुध्द कुठली?
छत अंगण घरे दारे
माणसांनी फुलली
गाण्याच्या तालावर
रस्सीखेच चालली ...
संक्रांतीचा सण
भरते अंगात वारे
जाती धर्म विसरून
आनंद लुटतात सारे ...
रंगीबेरंगी पतंग
अवकाशी नाचतात
बिचाऱ्या पक्ष्यांचे
प्राण मात्र घेतात ...
खेळ असो खेळासारखा
नको कुणाला इजा
सण साजरे करा,पण
वाईट गोष्टी करा वजा ..
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
बुधवार दि.16.01.19
शिक पोरी शिक
शिक पोरी शिक
बाराखडी शिक...
आई बापाला तू
माग ज्ञान भिक...
लग्न झाले तुझे
सुरू रांधा वाढा
खरकटी काढा
पाळणाही ओढा...
पायावर उभी
स्वावलंबी बन
ओरबाड जरा
अज्ञानाचे तण...
सोड अंधश्रद्धा
धर्म जाती भेद
वाचूनया काढ
आता चारी वेद...
अन्यायाचा बीज
नको देऊ वाढू
परंपरा खांब
रूढीलाही गाडू...
संस्काराची उटी
भाळावर लाव
जन्म तुझा सार्थ
जगालाही दाव...
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
बुधवार दि.१९.१२.१८
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...