मंगळवार, ९ जुलै, २०१९

ऋतु

...ऋतू...
ऋतु येतात जातात
त्या आठवणी होतात..
अन,पुन्हा एक दिवस
आठवांचे ऋतु होतात...
@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

ग्रहण

...ग्रहण...

ग्रहण सुटले की
किती बरं वाटतं...

काळ हेच उत्तर
किती खरं वाटतं...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

सुप्रभात

सुप्रभात

गुरुवार, ४ जुलै, २०१९

आठवण

तुझी आठवण नेहमी
डोळ्यात पाऊस आणते...
पावसासारखा तू लहरी
मनाला नेहमी सांगते...
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

बुधवार, ३ जुलै, २०१९

वारी

  वारी
आषाढीची वारी
पायाला भिंगरी
भेटेन श्रीहरी
पंढरीत..
जोडव्याचा नाच
बोटामधे चाले
हरी हरी बोले
नादधुंद ...
डोईची तुळस
पावसात डोले
मंजिरीही बोले
हरी हरी ...
सजली पालखी
सावलीला थांबे
मखराला लोंबे
आंबा पर्ण ...
Sangita Bhalsing

मंगळवार, २ जुलै, २०१९

आकाश

आकाश
रिकाम्या ढगांचे
आकाश असते ...
भरलेल्या ढगांचे
आभाळ असते ....
कितीही प्रयत्नाने
आकाश बरसत नाही....
जरासा गारवा लागला की ,
आभाळ बरसते....
Sangita Bhalsing

अंतरंग

जलौघवेगा वृत्त
लगालगागा लगालगागा

अंतरंग

दुखावलेल्या अशा मनाला
कधीच दावू नये जनाला...

लढा कुणाशी धडा कुणाला
उगीच शक्ती नको पणाला...

असा नको रे बळी पडू तू
क्षणिक मोहातल्या क्षणाला...

कमावलेल्या परावयाच्या
नकोस स्पर्शू दुज्या धनाला...

दुखावले पोट दोष कारे
उगीच अन्नातल्या कणाला...

मलिन रे अंतरंग झाले
उगाच का सजवतो तनाला

Sangita Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...