रविवार, १४ जुलै, २०१९

होकार

....होकार....

लाजरा तिरका कटाक्ष
मानेचा खोटा खोटा नकार...
काळजाने हळूच टिपला,
डोळ्यांचा खरा खरा होकार...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

बट



मंद हेलकावे घेते
इवली बट गालावर...
जणू लचकत नाचते
आठवांच्या तालावर...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

बंगला

बंगला


जिंदगीचा बंगला
उभार तू छान
कमी न पडेल
आनंदाचे धन ...

भिंत समतेची
मजबूत बांध
नको कुठे थोड़ी
जाती भेद सांध ...

छत आनंदाचे
सुखाचा पाऊस
आशा ठेव मनी
छान येई दिवस ...

संघर्षाची वाट
असली पाहिजे
मनगटी कर्तुत्व
वसले पाहिजे ...
**********

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
14/7/15

शनिवार, १३ जुलै, २०१९

तुळशी माळ

जय हरी

डाव - गझल

डाव - गझल 



मांडलेला डाव होता
मोडण्याचा डाव होता ..

जो कधी काळी उराशी
बांधलेला गाव होता ..

उधळलेल्या सोंगटयांचा
केवढा रे भाव होता..

तू रडीने खेळलेला
काळजावर घाव होता..

तो कटोरा रे दयेचा
आणलेला आव होता..

 Sangita B Bhalsing

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...