शुक्रवार, १२ जुलै, २०१९

संतवाणी

संतांची वाणी
सद्गुणांची खणी
अजरामर ...

Sangita Bhalsing

धून

सनई चौघडा
वाजवितो घन...
विठुच्या स्वागता
पावसाची धून ...

@.प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

विसावा

विसावा

विठुच्या पायाला
खळगा केवढा,
भक्ताच्या माथ्याचा
विसावा जेवढा...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

शेला

शेला

सावळ्याचा शेला
लाल लाल झाला,
गुलाल बुक्क्याचा
पावसाळा झाला....

@प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

कळस

कळस

पांडुरंगा तुझ्या
दारीची तुळस
मंदिरा कळस
मंजिरीचा...

@प्रा. सौ. संगिता भालसिंग

मन

काहीतरी सुटतय हातातून
    पण काय ते समजत नाही.
कदाचित मनाचा खेळ असावा
   ह्या मनाचा पण थांगपत्ता लागत नाही.
                           °°° पुजाविलास °°°

भूक - गझल

भूक

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...