🌹 श्रावण 🌹
सुगंधात आल्या सरी पावसाच्या
जशा अत्तराच्या सरी श्रावणाच्या...
असा गारवा हा शहारा मनावर
दिसे अंगणाशी खुणा पावलाच्या...
नव्या कागदाची अशी नाव सोडू
कथा सांग पाण्यातल्या साहसाच्या ...
पडे सारखा संथ शेवाळ आले
तुरे लोंबलेले शिरी कातळाच्या ...
अशी साद येते उभा पैलतीरा
घराचा दुरावा नको माणसाच्या ..
किती बरसतो हा पुराचाच धोका
उठे उंच लाटा उरी सागराच्या ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
12/08/2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.