गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

पाऊस धारा

 पाऊसधारा 

झरझर झरझर पाऊस आला
भिजले कुंतल,भिजला शेला ...

टपटप टपटप नयनावरती
चांदन मोती ठेऊन गेला ..

थरथर थरथर ओठावरती
गुज कोवळे सांगून गेला...

थुईथुई थुईथुई पदरावरती
शितल वारा नाचून गेला...

सरसर सरसर हातावरुनी
चंचल ओहळ वाहून गेला ...

खळखळ खळखळ गीत झऱ्याचे
काना वरती गाऊन गेला...

भरभर भरभर पाऊल खुणा
वाट निसरडी करुन गेला ...

किणकिण किणकिण काकण ओले
प्रेम सख्याचे वाचून गेले .....

प्रा.सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲