शुक्रवार, १२ जुलै, २०१९

पालखी

आज मंगळवार दि.१४ मार्च २०१७
एकमत वर्तमान पत्रातील पुरवणी
      🌻 साक्षी 🌻
मधे माझी कविता प्रकाशित.

सौ.संगिता भालसिंग
Sangita Bhalsing
अहमदनगर
माझी गझल

वृत्त-मंजुघोषा

गालगागा गालगागा गालगागा

पालखी

अडवितो का वाहणाऱ्या या नदीला
केवढा हा भार झाला पापणीला

गंधवाही भावनेला मोल नाही
कुस्करीले हुंगताना पाकळीला

बंधनाचा फास कारे या मनाला
देत आहे हीसका या साखळीला

संकटाचा सामना ही खेळलेला
जिंकण्याची गांठ बांधू ओढणीला

धावणाऱ्या पायवाटा संथ झाल्या
दे जरासा हात हाती सोबतीला

ओळखीच्या वादळाशी भांडताना
पळपुटा तूही बचावी कातडीला

सात जन्मी साथ होती का खरी रे
भोवऱ्याशी सोडले तू साजणीला

या नभाचे हुंदकेही पेलवेना
कंप आला काळजाच्या लेखणीला

तूच दे खांदा सुखाने तीरडीला
या तुझ्या आधी निघाल्या पालखीला

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
29/01/17

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲