गजल - मैत्री
ओढ आहे वेगळी ही छान मैत्री
अमर नाते जीवनी ही शान मैत्री
त्या भितीचा स्पर्श नाही थोडकाही
संकटाला थोपवाया दान मैत्री
सूर्य आहे सोबतीला मार्ग दावी
वाकडी ना वाट डावी भान मैत्री
ओल आहे साठलेली या मनाशी
काळजाचे हे सुगीचे रान मैत्री
बंध आहे रेशमाचे मलमली हे
भावनांनी मांडलेले ठाण मैत्री
प्रेम भरलेल्या सुरांनो साथ द्या रे
संगिताने गायलेले गान मैत्री
सौ.संगिता भालसिंग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.