व्यापार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यापार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १२ जुलै, २०१९

व्यापार - गझल



  व्यापार

मांडला बाजार आहे
तू खरा का यार आहे ...

सांग लोकांना उणीवा
त्रास याचा फार आहे...

केवढे आघात सारे
काळजावर वार आहे ...

हा तमाशा लावणीचा
आज आत्मा ठार आहे ...

उमगली सारी टवाळी
प्रेम ही व्यापार आहे ...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...