Questions लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Questions लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ७ जानेवारी, २०२६

स्वमत लिहा. वाहनांच्या अतीवापरामुळे शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात.

 स्वमत : वाहनांच्या अतीवापरामुळे शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात.

आजच्या आधुनिक जीवनशैलीत आणि तंत्रज्ञानाच्या युगात वाहनांचा वापर अपरिहार्य झाला आहे. अगदी थोड्या अंतरासाठीसुद्धा आपण दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर करतो.

स्वतःचे वाहन नसेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा मित्र मंडळीची मदत घेतो.या अतीवापरामुळे मानवी शरीरव्यवहारावर गंभीर परिणाम होत आहेत, असे मला वाटते. वाहनांमुळे शारीरिक श्रम कमी झाले असून माणूस अधिकाधिक निष्क्रिय बनत चालला आहे.

वाहनाच्या अती वेगामुळे शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात. स्वमत


पूर्वी लोक चालणे, सायकल चालवणे, शेतात किंवा कामावर पायी जाणे अशा क्रियांमुळे सतत हालचालीत असत. दिवसभर काम करत त्यामुळे दुपारीही आराम मिळत नसे.त्यामुळे रक्ताभिसरण योग्य राहून पचन, श्वसन आणि हृदयाचे कार्य सुरळीत होत असे. परंतु वाहनांच्या अतीवापरामुळे चालणे कमी झाले असून लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार यांसारखे आजार वाढताना दिसतात. शरीरातील ऊर्जा योग्यरीत्या खर्च न झाल्याने शरीरव्यवहारात अडथळे निर्माण होतात. तसेच मोबाईल फोन कानाला लावून वाहन चालवतात त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो.

याशिवाय वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदूषण श्वसनसंस्थेस हानी पोहोचवते. धूर, धूळ आणि विषारी वायूंमुळे फुफ्फुसांचे आजार, दमा, डोकेदुखी यांसारख्या समस्या वाढतात. सतत वाहनांवर अवलंबून राहिल्यामुळे मानसिक ताणतणावही वाढतो, ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.

म्हणूनच वाहनांचा वापर गरजेपुरताच करावा आणि चालणे, सायकलिंग, योगासने, व्यायाम यांचा दैनंदिन जीवनात समावेश करावा, असे मला वाटते. संतुलित जीवनशैलीच निरोगी शरीरव्यवहारासाठी आवश्यक आहे.


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

History (इतिहास)

 भारतीय स्वातंत्र्य चळवळेतील प्रमुख घटना

भारतातील स्वातंत्र्य चळवळ ही शेकडो वर्षांपासून चालत आलेली आणि अनेक नेत्यांच्या संघर्षाची कहाणी आहे. 11वी व 12वी विद्यार्थ्यांसाठी याचा अभ्यास महत्त्वाचा आहे कारण हे राष्ट्रीय इतिहास समजून घेण्यासाठी आधार देते.

प्रमुख घटना:

1857 – पहिले स्वातंत्र्य संग्राम

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध भारतीय सैनिकांचा बंड

नायक: माला पर्वत (Rani Laxmibai), तात्या टोपे, मांडूली

1885 – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना

स्वराज्य साधण्यासाठी राजकीय संस्था

नेतृत्व: अ‍ॅ. वर्धमान, गोपाल कृष्ण गोखले

1919 – जलियांवाला बाग हत्याकांड

ब्रिटिशांनी बेदर्दीने नागरिकांवर गोळीबार

संपूर्ण भारतात संताप

1920-22 – असहकार चळवळ

महात्मा गांधी यांचे नेतृत्व

ब्रिटिश वस्तू आणि शिक्षणाच्या विरोधात आंदोलन

1942 – भारत छोडो आंदोलन

पूर्ण स्वराज्याची मागणी

गांधीजींचे “Do or Die” संदेश

निष्कर्ष:

या घटनांमुळे भारतीय लोकांमध्ये एकात्मता व स्वातंत्र्यासाठी संघर्षाची भावना निर्माण झाली. बोर्ड परीक्षा तसेच स्पर्धा परीक्षांसाठी या घटनांचा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे.

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

इतिहास अभ्यासाचे महत्व

 इतिहास अभ्यासाचे महत्त्व - 


इतिहास हा केवळ भूतकाळातील घटना व तारखांचा अभ्यास नसून, तो आपल्या समाजाच्या, संस्कृतीच्या व विचारधारांच्या विकासाची कहाणी आहे. समाज मनाचा आरसा आहे.

११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास विषयाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे.

इतिहास अभ्यासाचे शैक्षणिक महत्त्व - 

इतिहासामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन, विश्लेषण व लेखन कौशल्य विकसित होते. प्रश्नांचे उत्तर मांडताना तर्कशुद्ध विचार करण्याची सवय लागते, जी बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त ठरते. तसेच

स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरते.

MPSC, UPSC, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक अशा स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहासाला विशेष महत्त्व आहे. 

११–१२ वी तील इतिहासाचा अभ्यास हा पुढील स्पर्धा परीक्षांचा मजबूत पाया ठरतो.

सामाजिक व राष्ट्रीय जाणीव

इतिहासाच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळ, समाज सुधारकांचे कार्य, राज्यघटना निर्मिती यांची माहिती मिळते. त्यामुळे राष्ट्रप्रेम, सामाजिक जबाबदारी व मूल्यांची जाणीव निर्माण होते. जबाबदार नागरिक तयार होतात. भूतकालीन पावलांचा मागोवा घेऊन भविष्याची वाटचाल करता येते.

वर्तमान घडामोडी समजण्यास मदत - 

आजच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक घडामोडी समजून घेण्यासाठी इतिहासाचा आधार आवश्यक असतो. भूतकाळातील घटनांमुळे वर्तमान कसे घडले, हे इतिहास शिकवतो. उत्तम मानवाची जडणघडण होते.

करिअरच्या संधी - 

इतिहास विषय घेऊन पुढे:

प्राध्यापक

संशोधक

प्रशासकीय अधिकारी

पत्रकार

लेखन व प्रकाशन क्षेत्र

अशा विविध करिअर संधी उपलब्ध आहेत.

व्यक्तिमत्त्व विकास - 

इतिहास अभ्यासामुळे संयम, दूरदृष्टी, निर्णयक्षमता व विचारशीलता वाढते. महान व्यक्तींच्या जीवनातून प्रेरणा मिळते. आदर्श घेता येतो.

निष्कर्ष - 

११ वी व १२ वी इतिहासाचा अभ्यास हा केवळ परीक्षा पास होण्यासाठी नसून, समाज जाणून घेण्यासाठी व भविष्य घडवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे इतिहास विषय मन लावून व समजून अभ्यासणे गरजेचे आहे.


Sangita Bhalsing 
Ahilyanagar 
Maharashtra 

अर्थशास्त्र – व्यवहारात आणि जीवनात महत्व -


अर्थशास्त्र – व्यवहारात आणि जीवनात महत्व - 

Importance of Economics subject for 11th and 12th standard students in daily life
Importance of Economics subject for 11th and 12th standard students in daily life


अर्थशास्त्र (Economics) हा फक्त केवळ पुस्तकातील विषय नाही, तर आपल्या रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला विषय आहे. 

काही लोक गमतीने अर्थशास्त्राला व्यर्थशास्त्र असे म्हणतात.परंतु ते चूकच आहे.कारण अर्थशास्त्राने मानवी जीवन व्यापलेले आहे.

दैनंदिन जीवनात आपण प्रत्येकजण अर्थशास्त्रातील विविध नियमांचा वापर करतो.पण आपल्याला ते लक्षातही येत नाही.

१. पैशाचा वापर आणि बचत

अर्थशास्त्र शिकल्याने विद्यार्थ्यांना पैसे कसे खर्च करावे, बचत कशी करावी हे समजते.

उदाहरण: जेव्हा तुम्ही बाजारात काही खरेदी करता, तेव्हा तुम्हाला किंमत, गरज आणि खर्च याचा विचार करता येतो.

२. व्यवहारातील निर्णय घेणे

अर्थशास्त्र शिकल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. व्यवहार कौशल्य वाढते.

उदाहरण: कोणत्या उत्पादनावर पैसे खर्च करायचे, कोणते उद्योग सुरू करायचे, हे कसे ठरवायचे. उत्पादन कसे,किती,कुठे करायचे? नवीन उद्योग किंवा स्टार्टअप सुरू करताना अर्थशास्त्राचा खूप फायदा होतो.

३. रोजगार आणि उद्योग

उद्योग, नोकरी, आर्थिक धोरण यांचा अभ्यास केल्याने भविष्यात करियर आणि व्यवसाय ठरवायला मदत होते.

उदाहरण: एखादी व्यक्ती व्यवसाय सुरू करणार आहे का, नोकरी करणार आहे का, हे अर्थशास्त्र समजल्यावर नीट ठरवता येते.

४. देश आणि समाजाचा अर्थ

देशातील आर्थिक धोरण, कर, उत्पादन, बचत आणि खर्च यांचा अर्थ समजतो. देशाची आर्थिक परिस्थिती समजते.

उदाहरण: पेट्रोलच्या किमती वाढल्या, महागाई वाढली, तर त्या निर्णयांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे लक्षात येते.

५. भविष्याची योजना

अर्थशास्त्र शिकल्याने आपण आर्थिक दृष्टिकोनातून भविष्याची तयारी करू शकतो.

उदाहरण: शेतकरी पीक, उद्योगपती नफा, गृहकर्ज घेणे, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, ही सगळ्या गोष्टी नीट समजतात.

विविध आर्थिक योजना समजतात,त्याचा लाभ घेता येतो.

Bank, शेअर मार्केट चे व्यवहार करता येतात.

शेवटी सांगायचे तर,

अर्थशास्त्र फक्त अभ्यासासाठी नाही, तर जीवनात पैसे, निर्णय आणि समाज समजण्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे.

जितके लवकर मुलांना याची जाणीव होईल, तितकी त्यांची व्यावहारिक बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढेल.

Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...