economics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
economics लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

अर्थशास्त्र – व्यवहारात आणि जीवनात महत्व -


अर्थशास्त्र – व्यवहारात आणि जीवनात महत्व - 

Importance of Economics subject for 11th and 12th standard students in daily life
Importance of Economics subject for 11th and 12th standard students in daily life


अर्थशास्त्र (Economics) हा फक्त केवळ पुस्तकातील विषय नाही, तर आपल्या रोजच्या जीवनाशी थेट जोडलेला विषय आहे. 

काही लोक गमतीने अर्थशास्त्राला व्यर्थशास्त्र असे म्हणतात.परंतु ते चूकच आहे.कारण अर्थशास्त्राने मानवी जीवन व्यापलेले आहे.

दैनंदिन जीवनात आपण प्रत्येकजण अर्थशास्त्रातील विविध नियमांचा वापर करतो.पण आपल्याला ते लक्षातही येत नाही.

१. पैशाचा वापर आणि बचत

अर्थशास्त्र शिकल्याने विद्यार्थ्यांना पैसे कसे खर्च करावे, बचत कशी करावी हे समजते.

उदाहरण: जेव्हा तुम्ही बाजारात काही खरेदी करता, तेव्हा तुम्हाला किंमत, गरज आणि खर्च याचा विचार करता येतो.

२. व्यवहारातील निर्णय घेणे

अर्थशास्त्र शिकल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. व्यवहार कौशल्य वाढते.

उदाहरण: कोणत्या उत्पादनावर पैसे खर्च करायचे, कोणते उद्योग सुरू करायचे, हे कसे ठरवायचे. उत्पादन कसे,किती,कुठे करायचे? नवीन उद्योग किंवा स्टार्टअप सुरू करताना अर्थशास्त्राचा खूप फायदा होतो.

३. रोजगार आणि उद्योग

उद्योग, नोकरी, आर्थिक धोरण यांचा अभ्यास केल्याने भविष्यात करियर आणि व्यवसाय ठरवायला मदत होते.

उदाहरण: एखादी व्यक्ती व्यवसाय सुरू करणार आहे का, नोकरी करणार आहे का, हे अर्थशास्त्र समजल्यावर नीट ठरवता येते.

४. देश आणि समाजाचा अर्थ

देशातील आर्थिक धोरण, कर, उत्पादन, बचत आणि खर्च यांचा अर्थ समजतो. देशाची आर्थिक परिस्थिती समजते.

उदाहरण: पेट्रोलच्या किमती वाढल्या, महागाई वाढली, तर त्या निर्णयांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे लक्षात येते.

५. भविष्याची योजना

अर्थशास्त्र शिकल्याने आपण आर्थिक दृष्टिकोनातून भविष्याची तयारी करू शकतो.

उदाहरण: शेतकरी पीक, उद्योगपती नफा, गृहकर्ज घेणे, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, ही सगळ्या गोष्टी नीट समजतात.

विविध आर्थिक योजना समजतात,त्याचा लाभ घेता येतो.

Bank, शेअर मार्केट चे व्यवहार करता येतात.

शेवटी सांगायचे तर,

अर्थशास्त्र फक्त अभ्यासासाठी नाही, तर जीवनात पैसे, निर्णय आणि समाज समजण्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे.

जितके लवकर मुलांना याची जाणीव होईल, तितकी त्यांची व्यावहारिक बुद्धी आणि निर्णय क्षमता वाढेल.

Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...