तू दूर
मी दूर
तरी मनी
एक सूर
येई प्रेमपूर
उठे काहुर
किती धरु
असा धीर
दे जरा हात
पुन्हा हाती धरु
नाजुक ओठ
पुन्हा स्पर्श करू
सौ.संगिता भालसिंग
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
तू दूर
मी दूर
तरी मनी
एक सूर
येई प्रेमपूर
उठे काहुर
किती धरु
असा धीर
दे जरा हात
पुन्हा हाती धरु
नाजुक ओठ
पुन्हा स्पर्श करू
सौ.संगिता भालसिंग
राजे
आजकाल लोक,फ़क्त म्हणतात
राजे,तुमच्या साठी काय पण ...!!
एक ओठात अणि एक पोटात
विचार कृतीत आणतात का पण ...?
तुम्ही परस्त्रीचा मान सन्मान केला
आज समाज हेच विसरून गेला
तुम्ही दुसऱ्या धर्माचा आदर केला
आज समाज इथेच घसरुन गेला
तुम्ही सुख सोडून दुःखात जगले
आज लोक ताळ तंत्र सोडून वागले
तुम्ही स्वराज्यासाठी प्राण पणाला लावले
आज लोक एकमेकांचे प्राण घ्यायला लागले
राजे,तुमची शिकवण लोक विसरले
नीतिमूल्य ,चारित्र्य सोडून घसरले
तुम्ही होते,स्वराज्य प्रेमाने भारलेले
आज लोक देशभक्तीही विसरले
राजे,पुन्हा या जन्माला
सन्मार्ग दाखवायला ...
तयार आहोत आम्ही
पुन्हा मावळे बनायला ...!!
प्रा. सौ.संगिता भालसिंग
Spsfun.com
*************************
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
*************************
मी मराठी,माझी मराठी
मी मराठी,माझी मराठी
नको फुकाचा जयघोष ,
आपणच बोलत नाही मराठी
देऊ नका दुसऱ्याला दोष ...!!
मराठी जगवा,मराठी जागवा
नुसते बोलून काय उपयोग ?
दुसऱ्याशी मराठी बोलून दाखवा
तरच होईल काही उपयोग ..?
मराठीचा डांगोरा नुसताच पिटू नका
तिचा मान सन्मान वाढवा
मराठीचा दर्जा घसरु देऊ नका
तिला वैभवाच्या शिखरी बसवा ...
प्रा. सौ.संगिता भालसिंग
27/02/16
🌷 माझे घर,माझे मंदिर 🌷
जिथे नाही प्रवेश मला
तिथे मी कशाला जाऊ ...?
विनाकारण नको तिथे
माझी शक्ती का दावू ...?
नाही जाणार मी कधीच
कोणत्याही मंदिरात ..
आहेत सारे देव देवता
जर माझ्याच घरात ...!!
माझ्या घरातील देव्हारा
जसा मंदिरातील गाभारा
येता जाता दर्शन घेता
निघून जाई शीण सारा ...!!
प्रिय आई बाप माझे
सासू सासरे ही माझे
सदा आशीर्वाद देणारे
देव्हाऱ्यातील देव माझे ...!!
बहिण-भावंडे , दिर-जावा
केसावानी दाट गण गोत
सुखा दुःखात साथ सोबत
जसे पंढरीचे वारकरी होत ...!!
पवित्र गाभारी शिजतो
खमंग देवाचा प्रसाद
चिल्यापिल्यांना हाक देतो
जसा मंदिरी घंटानाद ...!!
विष्णुची मी लक्ष्मी
रामाची मी सीता
नाही गरज कोणत्याही
दगडी देवाची आता ...!!
माझे घर,माझे मंदिर
तन मन धनाने पुजते
सुखी समाधानी संसार
प्रेमाची ज्योत तेवते ...!!
🌷🌷🌷🌷🌷🌷
प्रा. सौ.संगिता भालसिंग
24/02/16
काल पेरलेली स्वप्नं जळाली ,
उरी खोलवर अबोल घाव ...!!
आज मिळाली नवी उभारी ,
मांडला पुन्हा मी नवा डाव ...!!
***********************
प्रा. सौ.संगिता भालसिंग
*** तुळस ***
तुळशी ग बाई
तुझा जन्म रानी - वनी
ये ग माझ्या अंगणात
जागा देते वृंदावनी ।। १ ।।
तुझ्या प्रेमाच्या भजनात
दंग जाहले मी मनी
अशी आली बहरत
दरवळ पसरला जनी ।। २ ।।
बाळ कृष्णाच्या शोधात
फिरले मी लोक तिन्ही
नंद-यशोदेच्या गोकुळात
स्थळ हे झोकात ।।३ ।।
छान वाढली अंगणात
झाली तयारी जोरात
अशी वाजत - गाजत
आली दारात वरात ।।४ ।।
लग्नाला या हो तुम्ही
नका करू हो आळस
अशी लाडा कोड़ाची
माझी साजिरी तुळस ।।५।।
सौ.संगिता भालसिंग
४/११/२०१४.
***********
23 फेब्रुवारी 2015 च्या चपराक साहित्य
मासिकात प्रकाशित काव्य रचना
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...