*** तुळस ***
तुळशी ग बाई
तुझा जन्म रानी - वनी
ये ग माझ्या अंगणात
जागा देते वृंदावनी ।। १ ।।
तुझ्या प्रेमाच्या भजनात
दंग जाहले मी मनी
अशी आली बहरत
दरवळ पसरला जनी ।। २ ।।
बाळ कृष्णाच्या शोधात
फिरले मी लोक तिन्ही
नंद-यशोदेच्या गोकुळात
स्थळ हे झोकात ।।३ ।।
छान वाढली अंगणात
झाली तयारी जोरात
अशी वाजत - गाजत
आली दारात वरात ।।४ ।।
लग्नाला या हो तुम्ही
नका करू हो आळस
अशी लाडा कोड़ाची
माझी साजिरी तुळस ।।५।।
सौ.संगिता भालसिंग
४/११/२०१४.
***********
23 फेब्रुवारी 2015 च्या चपराक साहित्य
मासिकात प्रकाशित काव्य रचना
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.