माझी गझल
भुई भार
किती पाप सारे,भुई भार झाले
नसे चाड कोणास,लाचार झाले...
मनाच्या तळाशी कलीचे युग हे
नितीचे उखाणे तडीपार झाले ...
भुकेल्या जिवाला बहाणे तुपाचे
असे भाव खोटेच व्यापार झाले...
इथे कोण नाही कुणाचे कधीही
लगातार पाठीवरी वार झाले...
मरे रोज त्याला कुणी का रडावे
नक्राश्रू असे कोरडे क्षार झाले...
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
भुई भार
किती पाप सारे,भुई भार झाले
नसे चाड कोणास,लाचार झाले...
मनाच्या तळाशी कलीचे युग हे
नितीचे उखाणे तडीपार झाले ...
भुकेल्या जिवाला बहाणे तुपाचे
असे भाव खोटेच व्यापार झाले...
इथे कोण नाही कुणाचे कधीही
लगातार पाठीवरी वार झाले...
मरे रोज त्याला कुणी का रडावे
नक्राश्रू असे कोरडे क्षार झाले...
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर







