मंगळवार, ३० जुलै, २०१९

दवबिंदू

मराठी कविता - चंदेरी दवबिंदू 
दवबिंदू मराठी कविता, मराठी साहित्य


चंदेरी दवबिंदू
गालात हसला...
मऊ पाकळीवर
अलगद बसला...

गुलाबी फुलावर
जीव जडला...
प्रसंग मात्र बाका
अचानक घडला...

वाऱ्याच्या झोताने
मातीवर पडला...
क्षणभर जीवन
मनातच रडला...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

सोमवार, २९ जुलै, २०१९

श्रीमंती

श्रीमंती...

आठवांनी भरलेला
श्रीमंती थाट भारी....

सुख दुःखानी कोरलेला
भावनांचा घाट भारी...

प्रा. सौ. संगिता भालसिंग@
अहमदनगर

यात्री (चारोळी)

यात्री

साहित्य चारोळी मराठी



अनंताचा हा प्रवास
मी दिगंत यात्री...

दगड बनावा श्वास
ही यशाची खात्री...

प्रा. सौ. संगिता भालसिंग@
अहमदनगर

मात

मऊ केसावर फिरे
सावळ्याचा हात ...
कोवळ्या मनाच्या
करी वेदनेवर मात ...

Sangita B Bhalsing

रविवार, २८ जुलै, २०१९

संकोच


काहीतरी बोलायचं आहे
पण संकोच आड येतो...

मनातल्या गोड तरंगांचा
गाभूळलेला पाड होतो...

प्रा. सौ. संगिता भालसिंग@
अहमदनगर

बहर



जेवढी पसरत जाते ओल
तेवढी हिरवी होते मन वेल...

जेवढा सुगंधी फुलांचा बहर
तेवढा श्वासात कोवळा कहर...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर
सुप्रभात

बुधवार, २४ जुलै, २०१९

पान मळा

थेंब थेंब पाणी
मुळ करी गोळा...
खोडाच्या कष्टावर
हिरवा पान मळा...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...