रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

मराठी व्याकरण रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

१.व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.


०१) परी
०२) पांढरा
०३) परीस
०४) पारा

उत्तर - पांढरा

२.व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) आम्ही
०२) तुम्ही
०३) सर्व
०४) आपण

उत्तर - सर्व

३. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) गोरस
०२) गोरा
०३) गोरटेला
०४) भुरा

उत्तर - गोरस

४. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) असे
०२) तसे
०३) ससे
०४) जसे

उत्तर - ससे

५. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) ने
०२) आण
०३) येतो
०४) पाठव

उत्तर - येतो

६. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) येणे
०२) जाणे
०३) खाणे
०४) गाणे

उत्तर - गाणे

७. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) शाळेत
०२) शाळेजवळ
०३) शाळेपाशी
०४) शाळेकडे

उत्तर - शाळेत

८. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) काल
०२) काळ
०३) उद्या
०४) आज

उत्तर - काळ

९. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१)किंवा
०२) अथवा
०३) वार
०४) वा

उत्तर - वार

१०. व्याकरणदृष्ट्या किंवा रूपदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

०१) अभ्यास
०२) शाब्बास
०३) इश्श
०४) अरेरे

उत्तर - अभ्यास

Sangita_Bhalsing
Ahilyanagar, Maharashtra 

मराठी व्याकरण - अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

१. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा.

अ) दिवस
ब) अह
क)अहा
ड)वासर

उत्तर - अहा

२. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा

अ) नीर
ब) उदय
क) तोय
ड) सलील

उत्तर - उदय

३. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा

अ) अंडज
ब) खग
क) विहग 
ड) अनंत

उत्तर - अनंत

४. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा

अ) तम
ब) समीर
क) काळोख
ड) तिमिर

उत्तर -समीर

५. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा

अ) मृग
ब) कुरंग
क) काळवीट
ड) हरीण

उत्तर - काळवीट

६. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा

अ) दृष्टी
ब) चक्षू
क) अक्ष
ड) नेत्र

उत्तर- दृष्टी

७. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा

अ) शीर्ष 
ब) शिखर
क) मस्तक
ड) शीर

उत्तर - शिखर

 ८. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा

अ) मानवता
ब) मानव
क) मनुज
ड) मनुष्य

उत्तर - मानवता

९. अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा

अ) वसन
ब) पट
क) अंबर
ड) गगन

उत्तर - गगन

१०. 

अर्थदृष्ट्या गटात न बसणारा शब्द ओळखा

अ) पद
ब) पादुका
क) पाय
ड) चरण

उत्तर - पादुका

Sangita Bhalsing

मराठी व्याकरण -विशेषण

विशेषण ओळखा - विशेषण 

प्रश्न १. पुढील नामासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य विशेषणे वापरा.

१.लाडू:-

०१) तुरट
०२) तिखट
०३) गोड
०४) कडू

उत्तर - गोड

२.जेवण :-

०१)चमचमीत
०२) चकचकीत
०३) टळटळीत
०४) करकरीत

उत्तर - चमचमीत

३. किरण :-

०१) टपोरे
०२) कोवळे
०३) घुवाधार
०४) मुसळधार

उत्तर - कोवळे

४.रान :-

०१) निळेशार
०२) मंद
०३) हिरवेगार
०४) पिवळेधमक

उत्तर - हिरवेगार

५. मूल :-

०१) कठीण
०२) सौम्य
०३) कर्कश
०४) गोजिरवाणे

उत्तर - गोजिरवाणे

६. फूल :-

०१) सामासिक
०२) राजकीय
०३) सुवासिक
०४) भरजरी

उत्तर - सुवासिक

७. माती :-

०१) दमदार
०२) कसदार
०३)मजेदार
०४) बहारदार

उत्तर - कसदार

८. कुत्रा :-

०१) टनटणीत
०२) मऊ
०३) हिरवट
०४) इमानी

उत्तर - इमानी

९. लोक :-

०१) चावरे
०२) हौशी
०३) कातीव
०४) पांढरेशुभ्र

उत्तर - हौशी

१०. कपडे :-

०१) शहाणे
०२) वेडे
०३) सुंदर
०४) बावळट

उत्तर - सुंदर

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
Sangita_Bhalsing


मराठी व्याकरण - निर्दोष शब्द

 

१) दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखा.


विष्य

वीषय

विषय

वीशय


विषय


 २) दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखा.


माहिती

माहीती

माहीति

माहिति


उत्तर - माहिती


 ३) दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखा.


अट्टाहास

अट्टहास

आत्ताहास

आत्तहास

उत्तर - अट्टहास


४) दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखा.


आशिर्वाद

आर्शिवाद

आशीर्वाद

अशीर्वाद

उत्तर - आशीर्वाद


५. दिलेल्या पर्यायातून निर्दोष शब्द ओळखा.


अत्युश्या

आयुष्य

आयुषय

आयूश्य


उत्तर - आयुष्य


Sangita_Bhalsing

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

चारोळी

मी पण...


जसजसे मी पण सरते
तसतसे हृदयी प्रेम भरते ..
जरी उन सावली खेळ करते
तरी अंतरंग निष्काम उरते...

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर

शुक्रवार, १ मे, २०२०

नाते - चारोळी

नाते 


   फुलले अतूट नाते
        घट्ट आहे रुजून...

          पण हिशेब थोडा
                 बाकी आहे अजून..

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर


बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

सावरु दे - कविता

सावरु दे...


मुक्तपणे हवे तसे
वावरू दे मला...

डोईवर भार असे
सावरू दे मला...

भरारते पंख असे
पाखरू दे मला...

उबदार जिद्द अशी
पांघरू दे मला...

हिरकणी चालते अशी
ना हरू दे मला...

संगिता भालसिंग

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...