मंगळवार, २० जानेवारी, २०२६

मराठी 12 वी बोर्ड परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना.

 12 वी मराठी Marathi 12th

Board Exam 

बोर्ड परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना.

मराठी  12 वी  बोर्ड परीक्षेसाठी महत्वाच्या सूचना.

बोर्ड परीक्षे साठी जाताना कोणती पूर्वतयारी करावी?

कोणती काळजी किंवा दक्षता घ्यावी?

अभ्यास कसा करावा?

उत्तरपत्रिका कशी सोडवावी?

मन शांत, स्थिर कसे ठेवावे?

अशा तुमच्या मनातील अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळेल. त्यासाठी 

खाली दिलेली लिंक ओपन करा. Chrome browser मध्ये Link open करा.

https://youtu.be/FNCgM7ONLYk?si=Psui0v4YqZQX29ZK

व्हिडिओ आवडल्यास like, comment,share करा.


👉 व्हिडिओ आवडला तर नक्की Subscribe करा प्लीज 

👉 1 लाख Subscribers पूर्ण करण्यासाठी तुमचा सपोर्ट हवा आहे 🙏


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 


अर्थशास्त्र - इयत्ता १२ वी - महत्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न

 अर्थशास्त्र - इयत्ता १२ वी - महत्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न 

शाखा - कला आणि वाणिज्य 

अर्थशास्त्र - इयत्ता १२ वी - महत्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न


अर्थशास्त्र (49)

प्रश्न क्रमांक 6  

तीनपैकी दोन सोडवा.( गुण 16 )


महत्त्वाचे दीर्घोत्तरी प्रश्न 


1) सूक्ष्म अर्थशास्त्रचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा..

गुणदान ..

अर्थ..2 गुण

 वैशिष्ट्ये 6 गुण

अपेक्षित उत्तर...

प्रस्तावना 

सूक्ष्म अर्थशास्त्रचा अर्थ

उदाहरणासह स्पस्टीकरण 

सर्व वैशिष्ट्ये स्पस्टीकरणासह स्पष्ट करणे

समारोप.

एक मुद्दा - एक गुण 


2) घटत्या सिमांत उपयोगितेचा सिध्दांत स्पष्ट करुन गृहिते सांगा..

गुणदान ...

सिध्दांत...5 गुण

गृहिते ...3 गुण


अपेक्षित उत्तर...

प्रस्तावना 

सिद्धांताचे विधान / व्याख्या 

उदाहरण ..स्पस्टीकरण 

कोष्टक ...स्पस्टीकरण 

आकृती ...स्पस्टीकरण 

गृहिते ...किमान 5 गृहिते थोडक्यात स्पस्टीकरणासह लिहीणे..

समारोप ..


3) मागणीचा नियम स्पष्ट करुन अपवाद सांगा...

गुणदान ...नियम..5 गुण

              अपवाद 3 गुण

अपेक्षित उत्तर ...

प्रस्तावना 

नियमाचे विधान / व्याख्या 

उदाहरण ..स्पस्टीकरण 

कोष्टक ...स्पस्टीकरण 

आकृती ...स्पस्टीकरण .

अपवाद ..किमान 5 थोडक्यात स्पस्टीकरणासह..

समारोप ..


4) मागणीचा अर्थ सांगून मागणीवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा..

गुणदान ..मागणी अर्थ 2 गुण

          घटक 6 गुण

अपेक्षित उत्तर..

प्रस्तावना 

मागणी व्याख्या / अर्थ

उदाहरण 

मागणीवर परिणाम करणारे घटक सर्व...स्पस्टीकरणासह स्पष्ट करणे.

समारोप ..


5) मागणीच्या किंमत लवचीकतेचा अर्थ सांगून किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा..

गुणदान ...अर्थ 3 गुण

           प्रकार..5 गुण

अपेक्षित उत्तर...

प्रस्तावना 

किंमत लवचिकता अर्थ/व्याख्या 

सुत्र 

स्पस्टीकरण 

प्रकार सर्व आकृती सह स्पष्ट करणे

समारोप


6) पुरवठा नियण स्पष्ट करुन गृहिते सांगा..

गुणदान ...नियम 5 गुण

            ...गृहिते  3 गुण

अपेक्षित उत्तर

प्रस्तावना 

नियमाचे विधान / व्याख्या 

उदाहरण 

कोष्टक ..स्पस्टीकरण 

आकृती ...स्पस्टीकरण 

गृहिते ...किमान 5 थोडक्यात स्पस्टीकरणासह ..

समारोप..


7) मक्तेदारीयुक्त बाजारपेठेचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

गुणदान ...अर्थ..2 गुण

         .....वैशिष्ट्ये  6 गुण

अपेक्षित उत्तर 

प्रस्तावना 

अर्थ / व्याख्या स्पष्ट करणे

वैशिष्ट्ये ..सर्व वैशिष्ट्ये स्पस्टीकरणासह स्पष्ट करणे.

समारोप.,


8) राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगुन राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्त्विक व व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा..

गुणदान ..अर्थ 2 गुण

    तात्त्विक अडचणी 3 गुण

 व्यावहारिक अडचणी 3 गुण

अपेक्षित उत्तर..

प्रस्तावना 

अर्थ / व्याख्या 

तात्त्विक अडचणी किमान 4 मुद्दे स्पस्टीकरणासह 

व्यावहारिक अडचणी किमान 4 मुद्दे स्पस्टीकरणासह 

समारोप 


9) सार्वजनिक खर्चाचे प्रकार सांगून सार्वजनिक खर्च वाढीची कारणे स्पष्ट करा.

गुणदान ..प्रकार 3 गुण

          ..कारणे..5 गुण

अपेक्षित उत्तर..

प्रस्तावना 

खर्चाचे 4 प्रकार थोडक्यात स्पष्ट करणे..

खर्च वाढीची कारणे 4 मुद्दे स्पष्टीकरणासह स्पष्ट करणे.जी

समारोप ..


10 ) मध्यवर्ती बँकेची व्याख्या स्पष्ट करुन कार्ये विशद करा.

गुणदान ..व्याख्या 2 गुण

           ....कार्ये  6 गुण

अपेक्षित उत्तर..

प्रस्तावना 

व्याख्या एक किंवा दोन

सर्व कार्ये स्पस्टीकरणासह स्पष्ट करणे..

समारोप.


11)  सरकारच्या सार्वजनिक उत्पन्नाचे विविध स्त्रोत स्पष्ट करा

गुणदान ...उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांना एकत्रितपणे 8 गुण

अपेक्षित उत्तर...

प्रस्तावना ..

A) कर उत्पन्न ..अर्थ

    1) प्रत्यक्ष कर..

     2) अप्रत्यक्ष कर...

B) करेत्तर उत्पन्न ...

    सर्व स्त्रोत स्पष्ट करणे...


समारोप..


12) स्थूल अर्थशास्त्रचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा.

गुणदान ..अर्थ 2 गुण

          वैशिष्ट्ये 6 गुण

अपेक्षित उत्तर...

प्रस्तावना 

अर्थ/ व्याख्या 

उदाहरण 

वैशिष्ट्ये ...सर्व मुद्दे स्पस्टीकरणासह स्पष्ट करणे..

समारोप..


13) सार्वजनिक खर्च वाढण्याची कारणे स्पष्ट करा.

अपेक्षित उत्तर - 

८ कारणे स्पष्ट करणे


खालील यू ट्यूब व्हिडिओ लिंक ओपन करा.

अधिक मार्गदर्शन मिळेल.


https://youtu.be/nCmvzxcWcrs 


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

अर्थशास्त्र 12 वी - 80 गुण -प्रश्नपत्रिका आराखडा

 12 वी अर्थशास्त्र 80 गुण -प्रश्नपत्रिका आराखडा

12 वी अर्थशास्त्र 80 गुण -प्रश्नपत्रिका आराखडा, स्वरूप



प्र.१.अ) योग्य पर्याय निवडा. ( ०५ गुण )
ब) सहसंबंध पूर्ण करा.  ( ०५ गुण )
क) आर्थिक पारिभाषिक शब्द ओळखा. ( ०५ गुण )
ड) विधान व तर्क प्रश्न  ( ०५ गुण )

प्र.२. अ) खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. (५ पैकी ३) ( गुण ०६ )

ब) फरक स्पष्ट करा.(५ पैकी ३) (  गुण ०६ )

प्र.३.खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.(५ पैकी ३) ( गुण १२ )

प्र.४.खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सकारण स्पष्ट करा. (५ पैकी ३) ( गुण १२ )

प्र.५.खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. (३ पैकी २) ( गुण ०८ )

प्र.६. सविस्तर उत्तरे लिहा. (३ पैकी २) ( गुण १६ )

वरील माहिती सविस्तर हवी असेल तर 
खाली दिलेल्या यू ट्यूब व्हिडिओ ची लिंक ओपन करा.
काही प्रश्न, शंका,सूचना असल्यास कमेंट करा. 
Chrome browser मध्ये Link open करा.

https://youtu.be/V7VxPmTd3wo


Sangita Bhalsing 
Ahilyanagar 
Maharashtra 

“१२ वी मराठी कृतिपत्रिका – महत्वाच्या सूचना”

 🔷 इयत्ता १२ वी – मराठी कृतिपत्रिका / प्रश्नपत्रिका

🔷 महत्वाच्या मार्गदर्शक सूचना

विषय : मराठी | शाखा : कला, वाणिज्य, विज्ञान

इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेत मराठी विषयात भरपूर गुण मिळवायचे असतील, तर केवळ अभ्यास नव्हे तर कृतिपत्रिका सोडविण्याची योग्य पद्धत माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. 

“१२ वी मराठी कृतिपत्रिका – महत्वाच्या सूचना”  : Time Management | Writing Tips | Scoring Guide


खाली दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून अंमलात आणल्यास निश्चितच गुण वाढतील.

📝 कृतिपत्रिका सोडविताना घ्यावयाची काळजी

✔️ सर्व कृती/प्रश्न कृतिपत्रिकेत दिलेल्या क्रमानेच सोडवाव्यात.

✔️ प्रत्येक नवीन कृती स्वतंत्र पानावर सुरू करावी.

✔️ कोणतीही कृती आवश्यकतेपेक्षा जास्त सोडवू नये.

⏰ वेळेचे योग्य नियोजन (अतिशय महत्त्वाचे)

कृती सोडवताना खालीलप्रमाणे वेळेचे नियोजन करावे :

२ गुण → ४ मिनिटे

३ गुण → ६ मिनिटे

४ गुण → ८ मिनिटे

५ गुण → १० मिनिटे

⏱️ एकूण वेळ : ३ तास (१८० मिनिटे)

✍️ लेखनासाठी : १६० मिनिटे (८० गुण)

📖 उतारे वाचन + निबंधासाठी शेवटचे : २० मिनिटे

📄 उत्तरपत्रिकेतील पानांचे नियोजन

पूर्ण उत्तरपत्रिका साधारणपणे १७ ते २० पानांत सहज पूर्ण करता येते.

उदाहरण :

🔹 कृती १ (गद्य – २० गुण) → ४ पाने

🔹 कृती २ (पद्य – १६ गुण) → ३ पाने

🔹 कृती ३ (कथा – १० गुण) → ३ पाने

🔹 कृती ४ (उपयोजित – १४ गुण) → ४ पाने

🔹 कृती ५ (व्याकरण + निबंध – २० गुण)

  • व्याकरण → १ पान

  • निबंध → ३ पाने

➡️ एकूण : १८ पाने

📌 लक्षात ठेवा –

जास्त पाने म्हणजे जास्त गुण नाहीत.

अचूक, मुद्देसूद, नीटनेटके उत्तर हेच गुण वाढवते.

✍️ लेखनाबाबत महत्वाच्या सूचना

✔️ हस्ताक्षर सुवाच्य व स्वच्छ असावे

✔️ खाडाखोड टाळावी

✔️ एकाच पेनचा वापर करावा (शाई बदलू नये)

✔️ समास योग्य प्रमाणात ठेवावा

✔️ चौकटी/चौकोन पेन्सिलने नीट काढावेत

🌟 प्रेरणादायी सत्य

👉 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी देखील १०० पैकी ९९ गुण मिळवले आहेत.

👉 मागील वर्षी मुंबई विभागातून एका विद्यार्थ्याने १०० पैकी १०० गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला.

म्हणूनच, तुम्हीही नक्कीच करू शकता!

📌 कमी अभ्यास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी “कानमंत्र”

जर अभ्यास कमी झाला असेल तर खालील घटकांवर भर द्या :

1️⃣ सहा कविता

2️⃣ कोणतीही एक कथा

3️⃣ कोणतेही दोन उपयोजित घटक

4️⃣ व्याकरण

एवढा अभ्यास केला तरी अपेक्षित गुण नक्की मिळू शकतात.

🧾 उत्तरांच्या लांबीबाबत मार्गदर्शन

२ गुण → अर्धे पान

३ गुण → पाऊण पान

४ गुण → १ पान

५ गुण → दीड पान

📝 निबंध किमान ३ पाने लिहा.

आत्मवृत्तात्मक निबंधात प्रथमपुरुषी भाषा वापरा.

उदा. :

“मी शेतकरी बोलतोय”

→ मी स्वतः शेतकरी आहे असे समजून अनुभव मांडावा.


ता. क. Sangita Bhalsing या माझ्या यू ट्यूब चॅनल वर मागील वर्षाच्या कृतीपत्रिका उत्तरा सहित सोडलेले व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला याचा खूप फायदा होईल.

💐 शुभेच्छा

सर्व विद्यार्थ्यांना मराठी विषयात भरपूर गुण मिळावेत,

हीच आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या मित्र, मैत्रिणीला ही पोस्ट शेअर करू शकता.

अधिक माहिती साठी खालील व्हिडिओ नक्की पहा.

Crome ब्राउझर मध्ये लिंक ओपन करा.

https://youtu.be/vc1PJjPT-wk 


ही माहिती उपयुक्त वाटल्यास १२ वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा.

अशाच शैक्षणिक मार्गदर्शनासाठी ब्लॉग Follow करा.


– Sangita Bhalsing

अहिल्यानगर, महाराष्ट्र





रविवार, १८ जानेवारी, २०२६

मुळात शाश्वत असं काहीच नसतं…

 ✍️ लेख : मुळात शाश्वत असं काहीच नसतं…

“जीवनातील बदल, क्षणभंगुरता आणि वास्तव दर्शवणारे विचारमंथन करणारे चित्र”


प्रस्तावना

माणूस आयुष्यभर “कायमचं” काहीतरी शोधत असतो—नातं, संपत्ती, यश, सुख, सन्मान. पण वास्तव असं आहे की या जगात मुळात शाश्वत किंवा चिरंतन किंवा कायम असं काहीच नसतं. बदल हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे. जो बदल स्वीकारतो, तोच जीवन समजून घेतो. काळ, वेळ आणि माणूस देखील बदलतो.

जीवनाची क्षणभंगुरता

आज जे आपल्या जवळ आहे, ते उद्या असेलच याची खात्री नाही.

आरोग्य, पैसा, नाती, सत्ता—सगळंच काळाच्या ओघात बदलतं.

फुल आज उमलतं, उद्या कोमेजतं; दिवस उजाडतो, संध्याकाळ होते.

हीच जीवनाची खरी ओळख आहे—क्षणभंगुरता.

नात्यांची बदलती रूपं

नातीसुद्धा कायमस्वरूपी नसतात.

वेळ, परिस्थिती, अपेक्षा बदलल्या की नात्यांचे रंगही बदलतात. स्वरूपही बदलते.

म्हणूनच कोणावरही अति अवलंबून राहण्याऐवजी

समज, स्वीकार आणि क्षमाशीलता शिकणं गरजेचं आहे.

दुःख आणि सुख—दोन्हीही तात्पुरते

दुःख आलं की वाटतं, “हे कधी संपणार?”

सुख मिळालं की वाटतं, “हे असंच राहावं.”

पण सत्य असं की दोन्हीही क्षणिक आहेत.

हे उमजलं की माणूस समतोल शिकतो.

बदल स्वीकारणं म्हणजेच शहाणपण.

ज्याला बदलाची भीती वाटते, तो आयुष्यभर अस्वस्थ राहतो.

आणि जो बदलाला सामोरं जातो, तो परिपक्व होतो.

शाश्वत काहीच नसल्याचं भान

माणसाला आतून मजबूत, कणखर बनवतं.

कोणत्याही परिस्थितीत स्थितप्रज्ञ राहण्यासाठी स्वीकाराची वृत्ती असली पाहिजे. 

अशी वृत्ती संतत्व प्रदान करते. 

उदा. भाकरी फिरवली तर जळत नाही तसेच जीवनात बदल सहज स्वीकारला तर जीवन यशस्वी होईल.

निष्कर्ष

मुळात शाश्वत काहीच नसतं—

ना दुःख, ना सुख, ना यश, ना अपयश.

शाश्वत असेल तर ते फक्त बदलाचं अस्तित्व.

हे सत्य स्वीकारलं, तर आयुष्य अधिक हलकं, सुंदर आणि अर्थपूर्ण होतं.


Sangita Bhalsing

Ahilyanagar 

Maharashtra 

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

पर्यावरण संवर्धन : काळाची अत्यंत गरज ! मराठी निबंध

 पर्यावरण संवर्धन : काळाची अत्यंत गरज

🟢 १२ वी बोर्ड परीक्षा निबंध

विषय : पर्यावरण संवर्धन काळाची गरज

पर्यावरण संवर्धन दर्शवणारे वृक्षारोपण व स्वच्छ निसर्गाचे चित्र


प्रस्तावना

आजचा मानव विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अत्यंत सुखसोयींचे , आरामाचे जीवन जगत आहे. मात्र या प्रगतीसोबतच निसर्गाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. वृक्षतोड, प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, पाण्याची टंचाई, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरी भागातीलच नव्हे तर शहरी भागातील ही समस्या प्रचंड वाढलेल्या आहेत.त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करणे ही केवळ गरज नसून मानवजातीचे कर्तव्य बनले आहे.

पर्यावरण म्हणजे काय?

पर्यावरण म्हणजे आपल्याभोवती असलेली हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी, पर्वत, नद्या आणि समुद्र यांचा समुच्चय होय. मानवाचे अस्तित्व पर्यावरणावर पूर्णपणे अवलंबून आहे. पर्यावरण संतुलित असेल तरच सजीवांचे जीवन सुरक्षित राहते. सजीव आणि निर्जीव सृष्टीचे रक्षण आवश्यक आहे.

पर्यावरण ऱ्हासाची कारणे

औद्योगिकीकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या, अनियंत्रित वृक्षतोड, प्लास्टिकचा अति वापर आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण , जल प्रदूषण ही पर्यावरण ऱ्हासाची प्रमुख कारणे आहेत. नद्या प्रदूषित होत आहेत, जंगलांचे क्षेत्र कमी होत आहे, सिमेंटचे जंगल उभे केले जात आहे आणि अनेक प्राणी-पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व

पर्यावरण संवर्धनामुळे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण होते. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि सुपीक जमीन मिळते. नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी होतो. मानवाचे आरोग्य सुधारते आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पृथ्वी तयार होते.

पर्यावरण संवर्धनासाठी उपाय

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे,

प्लास्टिकचा वापर टाळणे,

पाण्याची बचत करणे,

सौर व पवन ऊर्जेचा वापर वाढवणे,

सार्वजनिक वाहतूक वापरणे,

कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे,

पर्यावरण विषयक जनजागृती करणे.

संविधानातील कर्तव्य: भारतीय संविधानाच्या कलम ५१-अ (जी) नुसार प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे की त्याने नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करावे.

निष्कर्ष

'एक व्यक्ती, एक झाड' या संकल्पनेपासून सुरुवात करून, आपण सर्व मिळून पर्यावरणाचे रक्षण करू शकतो आणि पृथ्वीला पुन्हा हिरवीगार बनवू शकतो. सुजलाम सुफलाम धरणी माता करण्यासाठी समूहाने प्रयत्न केला पाहिजे.

“निसर्ग वाचवा म्हणजे भविष्य वाचवा” हे वाक्य आज अत्यंत सार्थ ठरते. पर्यावरण संवर्धन ही फक्त सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज आपण निसर्गाची काळजी घेतली तरच उद्याची पिढी सुरक्षित आणि सुखी जीवन जगू शकेल. त्यामुळे पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.


Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Mahrashtra

बुधवार, १४ जानेवारी, २०२६

मकर संक्रांत – सण, परंपरा आणि सामाजिक संदेश.

 मकर संक्रांत – सण, परंपरा आणि सामाजिक संदेश.

✨ प्रस्तावना

मकर संक्रांत हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या सणाला धार्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक महत्त्व आहे.

तिळगुळ हातात धरलेली महिला – मकर संक्रांतीच्या शुभेच्छा


🌞 मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व

मकर संक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा काळ शुभ मानला जातो. या दिवशी स्नान, दान, पूजा यांना विशेष महत्त्व आहे. गंगेतील स्नान केल्यास पुण्य लाभते, अशी लोकांची श्रद्धा आहे.या दिवशी तिळगुळ वाटून, नवीन कपडे घालून, सुगड पूजन करून सूर्यदेवाची पूजा केली जाते,

सूर्य  मकर राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे सूर्याचे उत्तरायण सुरू होते. यानंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते.

🍬 तिळगुळाचे महत्त्व

“तिळगुळ घ्या – गोड गोड बोला” हा या सणाचा सुंदर संदेश आहे.

तीळ शरीराला उष्णता देतात तर गूळ ऊर्जा देतो. त्यामुळे आरोग्यदृष्ट्याही तिळगुळाचे सेवन उपयुक्त आहे. या सणातून मिठास,प्रेम आणि आपुलकी जपण्याचा संदेश दिला जातो.

🪁 पतंग आणि आनंद

मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी आनंदाने पतंग उडवतात. रंगीबेरंगी पतंगांमुळे आकाशात उत्सवाचे वातावरण निर्माण होते. विशेषतः शहरी भागात लोक पतंग उडवून जल्लोष करतात. मात्र बऱ्याच वेळा पतंग उडविताना अपघात ही होतात.

🌾 शेतकरी आणि पीक सण

हा सण शेतकऱ्यांसाठीही विशेष आहे. नवीन पीक घरात येते आणि शेतकरी आनंद साजरा करतात. त्यामुळे मकर संक्रांत हा कृतज्ञतेचा आणि समृद्धीचा सण मानला जातो.

🤝 सामाजिक संदेश.

मकर संक्रांत आपल्याला एकोप्याचा, प्रेमाचा आणि सद्भावनेचा संदेश देते. राग, द्वेष विसरून नातेसंबंध गोड करण्याचा हा सण आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.

🌸 निष्कर्ष

मकर संक्रांत हा केवळ सण नसून तो जीवनात सकारात्मकता, गोडवा आणि नवे विचार घेऊन येतो. तिळगुळासारखी गोडी आपल्या बोलण्यात आणि वागण्यात कायम राहो, हीच सदिच्छा.


*म - मधुर सदैव वाणी असावी.*

*क -कटुता स्नेहात कधी न यावी.*

*र - रस गंधांची उधळण व्हावी.*

*सं - संस्कारांची मांदियाळी दिसावी.*

*क्रां - क्रांती विचारांची मनी ठसावी.*

*ती - तीनही लोकी कीर्ती व्हावी.* 


*मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा.*☘️🪴

Sangita Bhalsing 

Ahilyanagar 

Maharashtra 

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...