नेटभारी इ दिवाळी अंक 2016 मधे
माझ्या कविता अणि अभंग प्रकाशित 💐
आभार शब्दगंध शब्दरंग मराठी साहित्य
कला दर्पण.....
सौ.संगिता भालसिंग
11वी,12वी Arts, Commerce, Science विषयांचे मराठी नोट्स, PDF, प्रश्नपत्रिका व मार्गदर्शन तसेच साहित्य.
नेटभारी इ दिवाळी अंक 2016 मधे
माझ्या कविता अणि अभंग प्रकाशित 💐
आभार शब्दगंध शब्दरंग मराठी साहित्य
कला दर्पण.....
सौ.संगिता भालसिंग
माझी गझल २८
🌻 तुझ्यासाठी 🌻
संकटे झेलतो तुझ्या साठी
वादळे पेलतो तुझ्या साठी
येउन बैस अंगणी माझ्या
बंगला बांधतो तुझ्या साठी
वेळ आली नव्या सुधारणेची
भोजना रांधतो तुझ्या साठी
काळ गेला जुन्या प्रथांचा तो
या शिवा लांघतो तुझ्या साठी
'बैल'म्हणून नाव ठेवीता
हे खडे टोलतो तुझ्या साठी
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
आज मंगळवार दि.२५/१०/१६
एकमत वर्तमान पत्रातील साक्षी
पुरवणी मधे माझी कविता प्रकाशित
" मोक्ष "
सौ.संगिता भालसिंग
माझी गझल २९
🌷 दिवाली 🌷
भावनांची ही दलाली
वेदनांना कोण वाली
मान काहीही मिळेना
भोगदासी कामवाली
हुंदका ही दाटला तो
चाखतांना ओठलाली
उष्णखारे ओघळे हे
आसवांचे थेंब गाली
चार पैसे फेकतांना
दाग देतो तो मवाली
ताल सूर भग्न होता
गात होती ती कवाली
बाळ तान्हे भूक पोटी
थुंकलेली ही दिवाली
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
वृत्त कादंबरी
माझी गझल
🌻 सावली 🌻
सावलीशी बोलते
भावनांना खोलते
सांजवेळी रेशमी
आठवांना तोलते
काळजावर घावही
आनंदाने झेलते
वेदनांचा ताल हा
नाचतांना डोलते
कुंकवाला रेखिते
भूतकाळा टोलते
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
माझी गजल
लगीन घाई
उगीच आता नको लढाई
नकोस मारू आता बढाई
भरून घेऊ रसाळ प्रेमा
अशी रिकामी नको कढाई
अधीर स्वप्नास जिंकण्याला
चला करूया अशी चढाई
तुझ्या मनाच्या फुलेल बागा
तुलाच देतो अशी बधाई
अतूट बांधू रेशीम गाठी
करू सखे ही लगीन घाई
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
Copyright
माझी गजल २५
ज्योत
ज्योत हाती तेवते
तेजतारा दावते
प्रेमधागा रेशमी
साजनाला बांधते
उजळल्या दाही दिशा
स्नेहमाया ओतते
सागराशी चांदणे
नाहतांना चालते
सैरभैरी भावना
वाट तुझी पाहते
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...