माझी गजल
लगीन घाई
उगीच आता नको लढाई
नकोस मारू आता बढाई
भरून घेऊ रसाळ प्रेमा
अशी रिकामी नको कढाई
अधीर स्वप्नास जिंकण्याला
चला करूया अशी चढाई
तुझ्या मनाच्या फुलेल बागा
तुलाच देतो अशी बधाई
अतूट बांधू रेशीम गाठी
करू सखे ही लगीन घाई
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
spsfun.com
Copyright
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.