माझी गझल २९
🌷 दिवाली 🌷
भावनांची ही दलाली
वेदनांना कोण वाली
मान काहीही मिळेना
भोगदासी कामवाली
हुंदका ही दाटला तो
चाखतांना ओठलाली
उष्णखारे ओघळे हे
आसवांचे थेंब गाली
चार पैसे फेकतांना
दाग देतो तो मवाली
ताल सूर भग्न होता
गात होती ती कवाली
बाळ तान्हे भूक पोटी
थुंकलेली ही दिवाली
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.