मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

मर्म

मानू नये जाती-धर्म
करा फक्त सत्कर्म ...
जगा, जगु दया नि जगवा
हेच जीवनाचे खरे मर्म...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

लेखणी - मराठी कविता

🖊 लेखणी 🖊
🌹🌹🌹🌹🌹🌹
लेखणीची धार तू
लेखणीचा आधार तू
लेखणीचा स्वार तू
लेखणीचा हार तू

लेखनाचा मार्ग तू
लेखनाचा स्वर्ग तू
लेखनाचा पार्थ तू
लेखनाचा अर्थ तू

लेखनाचे सार तू
लेखनाचे आसार तू
लेखनाचे द्वार तू
लेखणीचा उद्धार तू

लेखणीचे मर्म तू
लेखणीचे कर्म तू
लेखणीचा धर्म तू
लेखणीचे चर्म तू

लेखणीचा राम तू
लेखणीचा शाम तू
लेखणीचा भरत तू
बद्ध माझ्या उरात तू

सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर


शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

दुष्ट काव्य चोरांनो

आज शुक्रवार दिनांक 16.08.19 रोजी परळी समाचार मधे माझी कविता प्रकाशित...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

संसार



जरी पडला
उघडा संसार..
लढ जिद्दीने
नको मानू हार...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९

पाऊस

पावसा तुझं गणित
आम्हाला कळत नाही...
तुझ्या विना सृष्टी
अजिबात फळत नाही...

जिथे नको तिथे तू पडतो
जिथे हवा तिथे तू अडतो
सांग असे का करतो ?
दुःखाची काठी का धरतो?

 अडचन आणि खोळंबा
अशी सारी कथा आहे
तुझ्याविन जीवन सुने
हीच खरी व्यथा आहे

कितीही त्रास दिला तरी
तू आम्हाला हवा आहेस..
दरवर्षी वाट पाहून येतोस तू
तेंव्हा वाटते नवा आहेस तू...

प्रा. सौ. संगिता भालसिंग

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१९

पापणी



भिजलेली पापणी
बोलू नाही शकत...
आसवांची करणी
तोलू नाही शकत...

प्रा. सौ. संगिता भालसिंग
अहमदनगर

रविवार, ४ ऑगस्ट, २०१९

मैत्री - गझल

गजल - मैत्री 




ओढ आहे वेगळी ही छान मैत्री
अमर नाते जीवनी ही शान मैत्री

त्या भितीचा स्पर्श नाही थोडकाही
संकटाला थोपवाया दान मैत्री

सूर्य आहे सोबतीला मार्ग दावी
वाकडी ना वाट डावी भान मैत्री

ओल आहे साठलेली या मनाशी
काळजाचे हे सुगीचे  रान मैत्री

बंध आहे रेशमाचे मलमली हे
भावनांनी मांडलेले ठाण मैत्री

प्रेम भरलेल्या सुरांनो साथ द्या रे
संगिताने गायलेले गान मैत्री

सौ.संगिता भालसिंग



New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...