माझी गजल ४३
वॄत्त - मनोरमा
गालगागा गालगागा
मौन आहे आज आता
जाहले नाराज आता
हा अबोला का धरावा
शोधतो का काज आता
सावलीशी का दुरावा
भावतो का साज आता
देत होता का पुरावा
अमर प्रेमी नाज आता
वेदनेने का झुरावा
या मनाचा ताज आता
आठवांनी का करावे
या दिलावर राज आता
का पुन्हा मागे फिरावे
सोडली रे लाज आता
सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.