सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

माझी गजल ४४

माझी गजल ४४

वॄत्त अनलज्वाला
मात्रा २४
८+८+८

अभंग नाते

प्रेमाचे हे अभंग नाते जोडू आता
परंपरेच्या घट्ट शृंखला तोडू आता

आनंदाची स्वप्नवाट ही शोधण्या नवी
गंजल्या अशा भक्कम रूढी मोडू आता

जीवन दाहक नकोनकोसे घेऊ हाती
आज पाण्यात तिलांजली ही सोडू आता

क्षितिजावरती दिसणाऱ्या त्या काळ्या काळ्या
अंधाराच्या कातळालाच फोडू आता

आज वेगळ्या वाटेवरती चल जोडीने
जातीधर्मात कोरले नाव खोडू आता

प्रा. सौ.संगिता भालसिंग
अहमदनगर
Copyright
spsfun.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲