मूळ गीत
Song: गाडी चालली घुंगराची
Artist: प्रल्हाद शिंदे
lyricist: साहेबराव कोकाटे
composer: मधुकर पाठक
गाडी चालली घुंगराची, वाट बाई डोंगराची
वेळ कडक नि बाराची, वाट बाई डोंगराची
पहिल्यानं गाडीत बसले मी आज
कोकणात आहे माहेर माझं
आईबाप माझं दर्याचं राजं
मला सवय बंदराची, वाट बाई डोंगराची
दणक्यावर दणका बसतो ग बाई
दणक्यानं जीव हा व्याकूळ होई
तिकडच्या स्वारीला पर्वाच नाही
ह्या भयाण जंगलाची, वाट बाई डोंगराची
घरात वागे तशी दारात
रात्रीचा दिसं करी दिसाची रात
भारी उताविळ ही पुरुषाची जात
आहे लबाड मुलखाची, वाट बाई डोंगराची
समोर दिसतंय् आपुलं गाव
कसं वाटं ना तुम्हाला भ्यावं
पुरे पुरे आता भास्करराव
ओढाताणी ही पदराची, वाट बाई डोंगराची
*********************
जोडी कोंडली उंदराची,गाठ आहे पिंजऱ्याची
जाड झडप नि दाराची, गाठ आहे पिंजऱ्याची
गोठ्याच्या दारात पडलेली बाज
गोणपाट आहे घरं हे माझं
मुलंबाळं सारी सुखात साजं
मिळे चवड गाजराची,गाठ आहे पिंजऱ्याची
पाठीवर फटकन बसतो रं झाडू
मालकीन दडवून ठेवते लाडू
टकल्याच्या रागाला कसं रं काढू
या खडूस मालकाची ,गाठ आहे पिंजऱ्याची
पुशीत मिश्या बसे मांजरी
कुत्र्याची गस्त सदा भो भो करी
जावं कसं बिळात माझ्या घरी
खोड हुशार सापाची,गाठ आहे पिंजऱ्याची
उरात होतंयं धडपड फार
कसंही वाटे व्हावं पसार
तुटे तुटे ना हे भक्कम दार
भिती आहे मरणाची,गाठ आहे पिंजऱ्याची
सौ.संगिता भालसिंग