सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१८

उखाणा

उखाणा

01

काळजाचे पान करते
शब्द माझे प्राण करते
मांडते उखाणा आता
लेखणीला छान करते ...
भावनेचा दर्द भरते
या जिवाचे रान करते ...
वाचतांना सर्वांचे मी
ऐकण्याला कान करते
समज आहे थोडकीशी
लेखन थोडे सान करते ...
भरतकुमारचे नाव घेते
आदराने तुमचा मान करते...

02

अडवू नको वाहणाऱ्या या नदीला
केवढा हा भार झाला या पापणीला
गंधवाही भावनेला मोल आले कुस्करून हुंगताना पाकळीला
बंधनाचा फास शोभे या मनाला
ठेव जपून हृदयात या साखळीला
संकटांचा सामना ही खेळलेला
जिंकण्याची गाठ बांधू ओढणीला...
धावणाऱ्या पायवाटा संथ झाल्या
दे जरासा हात हाती सोबतीला...
ओळखीच्या वादलाशी भांडताना
नाही बचावले कातडीला ...
साथ जन्मी साथ होती खरी रे
भोवऱ्याशी सोडू नको तू साजणीला...
या नभाचे हुंदके ही पेलवेना
कंप आला काळजाच्या लेखणीला...
भरतकुमारचे नाव घेऊन
हात जोडून विनंती देवाला...
तूच दे खांदा सुखाने तिरडीला
या तुझ्या आधी निघाल्या पालखीला ...

Sangita Bhalsing

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सभ्य व विषयाशी संबंधित प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

New Post

क्रश सकाळचे सहा वाजले की गल्लीत सायकलीची घंटी वाजायची. "पेपर... पेपर..." तो आवाज ऐकला की सईच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटायचं. सई... ...

📲